Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे पदार्थ महागले

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील बटाटे आणि रताळू बाजारपेठेत दाखल झाले आहेत. गुणवत्तेनुसार बटाटे आणि रताळे वीस ते तीस रुपये प्रतिकिलो
Mahashivratr
Mahashivratr sakal
Updated on

धुळे- महाशिवरात्रीनिमित्त शहरासह जिल्ह्यातील श्री महादेवाची मंदिरे सजविण्यात आली. भाविकांकडून उपवास राखत महादेवाची आराधना होते. त्यामुळे निरनिराळ्या व्यावसायिकांनी उपवासातील खाद्यपदार्थ विक्रीस आणले आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील बटाटे आणि रताळू बाजारपेठेत दाखल झाले आहेत. गुणवत्तेनुसार बटाटे आणि रताळे वीस ते तीस रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहेत. दरम्यान, भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता महादेव मंदिरांमध्ये गर्दीचे नियमन कसे करता येईल याची काळजी घेण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com