धुळे- वीज महावितरण कंपनीकडे जमा सुरक्षा ठेवीवर धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील लघुदाब वीज ग्राहकांना २०२४- २५ या आर्थिक वर्षासाठी एकूण चार कोटी ३३ लाखांचे व्याज अदा करण्यात आले. ही रक्कम थेट संबंधित ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे. धुळे मंडलातील तीन लाख आठ हजार ९९४ ग्राहकांना तीन कोटी सहा लाख, तर नंदुरबार मंडलातील एक लाख २१ हजार २५५ ग्राहकांना एक कोटी २७ लाख रुपयांचे व्याज अदा करण्यात आले.