धुळे- धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यांतील ग्राहकांचे जुने वीजमीटर काढून त्याऐवजी नवीन ‘टीओडी’ वीजमीटर बसविण्यात येणार आहेत. शहरातील विविध शासकीय कार्यालयांपासून हे वीजमीटर बसवायला सुरुवातही झाली. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात साडेतीन लाख ग्राहकांकडे हे वीजमीटर बसविण्यात येणार असल्याची माहिती ‘महावितरण’च्या सूत्रांनी दिली.