मेहुणबारे (ता.चाळीसगाव)- जंगलातील हरणांची शिकार करून त्यांच्या मांसाची विक्री करणाऱ्या संशयित आरोपींना येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाच शिकारी वाहन सोडून फरारी झाले होते. त्या पाचपैकी वकील अहमद शकील अहमद (वय २८) या एका संशयिताला वन विभागाच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा लावून शनिवारी (ता.३) मालेगाव येथून अटक केली आहे.