अत्याचार करणाऱ्या नराधमास ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

नंदुरबार: भोरकुंड (ता. अक्कलकुवा) येथील युवतीला घरात एकटे गाठून अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने त्यास सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

मोलगी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भोरकुंड (ता. अक्कलकुवा) येथील अरविंद धन्या तडवी याने युवतीचे आई वडील शेतात कामाला गेलेले असतांना युवतीस घरात एकटी गाठून तिच्यावर अत्याचार केला होता. नंतर याबाबत कोणासही सांगितल्यास तुला जिवेठार मारीन असा दम दिला होता. 

पिडीत युवतीने बदनामीपोटी कोणासही न सांगता गप्प राहिली होती. परंतु या संधीचा फायदा घेत अरविंदने तिचावर वेळोवेळी अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती राहिली होती. हे २६ जून २०१५ ला औषधोपचार कामी तिचे आई वडिलांनी रुग्णालयात नेले असतांना उघड झाले.त्यावेळेस तिला आई वडिलांनी व नातेवाइकांनी आणि पोलिसांनी विचारणा केली असता पिडीत युवतीने अरविंद धन्या तडवी याने सुमारे ३ महिने अत्याचार केल्याचे सांगितले होते.त्यावरून ५ जुलै २०१५ ला मोलगी पोलिसात अरविंद धन्या तडवी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

त्या खटल्याची सुनावणी शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एम. पठाडे यांचा कोर्टात आज झाली.गुन्हा निष्पन्न झाल्याने अरविंद धन्या तडवी यांस न्यायालयाने ७ वर्ष सश्रम कारावास व २० हजाराचा दंडांची शिक्षा सुनावली आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Man sentenced to seven years rigorous imprisonment