Nandurbar News : बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nandurbar News

Nandurbar News : बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक

नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा डिसेंबर २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीतील तेराव्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी जोडणी करणे बंधनकारक आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे. (Mandatory linking of bank account with Aadhaar Nandurbar News)

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ आधारशी संलग्न बँक खात्यामध्येच प्राप्त होणार असल्याने ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही त्यांचे बँक खाते आधारशी संलग्न केलेले नसेल अशा प्रलंबित लाभार्थ्याचे बँक खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत (आयपीपीबी) खाती उघडण्याची व ते खाते आधार क्रमांकाशी जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नंदुरबार जिल्ह्यात १४ हजार ९९३ लाभार्थ्यांनी पीएम किसान लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणी केलेले नाही, अशा प्रलंबित लाभार्थ्यांची तालुका व गावनिहाय यादी पोस्ट कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पात्र लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व मोबाईल क्रमांक जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन आपले खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे, असे आवाहन श्री. खांदे यांनी केले आहे.पात्र लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व मोबाईल क्रमांक जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन आपले खाते आधार क्रमांकास जोडून घ्यावे, असे आवाहन श्री. खांदे यांनी केले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस