Positive News : लेक माझी लाडाची; थाळनेरची घडवतेय माता-पित्यांना विदेशवारी..!

Seated from left to right manisha patil with family
Seated from left to right manisha patil with familyesakal

कुसुंबा (जि. धुळे) : लेक (कन्या) म्हटली म्हणजे नेहमी ती पती (Husband) व सासू-सासऱ्यांच्या घरी जाणारी असते. सतत मुले, पती, सासू, सासरे यांच्या विचारात असते. मात्र काही भाग्यवान माता-पित्यांना गुणवान मुलगी लाभलेली असते. (Manisha patil thalner citizen going to take parents for abroad trip dhule news)

सासू-सासऱ्यांसह मातापित्यांवरही तेवढेच प्रेम करणारी असते, असेच काहीसे थाळनेर (ता. शिरपूर) येथील प्रगतिशील शेतकरी रमेश पीतांबर निकम (वय ७३) व मंगलाबाई रमेश निकम (६६) यांची कन्या मनीषा (नीलिमा) नितीन पाटील ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्न शहरात नोकरीला आहेत. त्यांचे पती नितीन पाटील हेही कॅनडा येथे जॉबला आहेत.

सध्या त्या परिवारासह माहेरी (थाळनेर, ता. शिरपूर) येथे आल्या आहेत. मनीषा यांचे स्वप्न होते, की आपण आपल्या आई-वडिलांना आपल्यासोबत विदेशवारी घडवावी. त्यानुसार त्या आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यांच्या या विचाराने आई-वडीलही आनंदाने भारावले आहेत.

कन्या असून माता-पित्यांना विदेशवारी घडवून आणत असल्याने हा विषय आप्तेष्ट, ग्रामस्थांसह अनेकांसाठी प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे. येत्या ५ मार्चला त्या वडील रमेश निकम, आई मंगलाबाई निकम यांना सोबत घेऊन नाशिकहून ऑस्ट्रेलियाला प्रयाण करणार आहेत. कोविड काळात परदेशातील अनेक मुलांनी आपल्या आई-वडिलांचा आजपावेतो तपासही केला नाही असे कटू प्रसंगही समाजात पाहायला मिळाले आहेत.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Seated from left to right manisha patil with family
Positive News : 87 वर्षीय आजींनी दिली सैनिकांना 5 लाखाची भेट! वाढदिवसाच्या कार्यक्रमांना फाटा

मात्र कन्या असून, स्वेच्छेने आई-वडिलांना विदेशवारी घडविणार असल्याचे चित्र विरळाच म्हणावे लागेल. मनीषा यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी निर्मला निकम (मोठीआई), राजेंद्र निकम, सीमा निकम, नितीन निकम, मनीषा निकम, अनिल पाटील व वैशाली पाटील, शोभना साळुंखे, डॉ. स्वयंमराव साळुंखे, ऊर्मिला करंदीकर, प्रमिला सोनवणे, प्रवीण निकम, उज्ज्वला निकम, संजय साळुंखे, रत्ना साळुंखे, किरण निकम, विद्या निकम, सुवर्णा शिंदे, आदित्य पाटील आदींनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

"आई-वडिलांनी माझ्यासोबत एकदा विमान प्रवास करावा अशी अनेक दिवसांपासूनची माझी इच्छा होती अन् ती आता पूर्ण होणार आहे. आपण विमानाने विदेशात जाऊ या विचाराने त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून माझ्या मनाला खूप समाधान लाभत आहे.

मी जॉबनिमित्ताने पंधरा वर्षांपासून आस्ट्रेलियाला आहे. तिकडील वातावरण, राहणीमान, विविध प्रेक्षणीय स्थळे त्यांना पाहायला मिळावीत, अजून दोघेही महाराष्ट्राच्या बाहेरही गेले नाहीत. वडील प्रगतिशील शेतकरी आहेत. शेतीपलीकडेही अनेक गोष्टी आहेत हे त्यांना ऑस्ट्रेलियात येऊन समजणार आहे. त्यांना विदेशवारी घडविल्याने मी धन्य होणार आहे." - मनीषा पाटील, थाळनेरची लेक

Seated from left to right manisha patil with family
Padhavad Banana Crop : पढावदच्या केळीला जम्मू-काश्मीरमध्ये मागणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com