Banana Crop Demand : पढावदच्या केळीला जम्मू-काश्मीरमध्ये मागणी!

Sharad Pawar's farms of half a million liters. In the second photo, a banana garden.
Sharad Pawar's farms of half a million liters. In the second photo, a banana garden.esakal

कापडणे (जि. धुळे) : पढावद (ता. शिंदखेडा) येथील (Padhavad Banana Crop) शेतकरी शरद पवार (Sharad Pawar) प्रतिकूल परिस्थितीत केळीचे निर्यातक्षम उत्पादन घेत आहेत. (Padhavad Banana Crop Demand in Jammu and Kashmir dhule news)

शेतजमीन काळी पण चिकणमाती, पाण्याचा निचरा न होणारी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या जमिनीत केळी येत नाही. शेतजमिनीत पाणी नाही. उन्हाळ्यात शेतात कोणतीही पिके नाहीत. उष्ण हवेचा त्रास तरीही आठ-दहा वर्षांपासून श्री. पवार निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेत आहेत.

केळी जम्मू-काश्मीरमध्ये पॅकिंग करून पाठविली जात आहे. केळीची पाहणी कृषी आयुक्त धीरजकुमार, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, धुळे कृषी विज्ञान केंद्र आदींनील पाहणी केली आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Sharad Pawar's farms of half a million liters. In the second photo, a banana garden.
Ideal Wedding : वणीत मुस्लिम समाजात आदर्श विवाह; पाहण्याच्या कार्यक्रमातच आटोपला निकाह!

सव्वा कोटी लिटरचे शेततळे

शेतजमिनीला पाण्याची सोय नसल्याने सहा किलोमीटरवर असलेल्या तापी नदीपात्रातून उपसा सिंचन करून पाण्याची समस्या सोडविली. सर्व शेतात ठिबक सिंचन आहे. गटशेतीच्या माध्यमातून ऑटोमेशनची व्यवस्था केली. सव्वा कोटी लिटरचे शेततळे केले. वेळेनुसार जेवढ्या पाण्याची व विद्राव्य खतांची गरज आहे तेवढीच दिली जातात.

आखातातही निर्यात

शेतात नवती, पिलबाग, कांदेबाग व तिरी असे जवळपास तीस हजार केळी झाडे शेतात उभी आहेत. त्याची कापणी सुरू आहे. केळीचे भाव तेजीत आहेत. नुकतीच तीस टन केळीची कापणी झाली. त्यास दोन हजार ६०० व दोन हजार ६५० पर्यंतचा भाव मिळाला. केळी साफ करून बॉक्स पॅकिंग करून जम्मू-काश्मीरला पाठविण्यात आली.

पिलबागची रास वीस किलो (सरासरी प्रतिझाड) पडत आहे. पुढे नवतीची रास तीस किलोंची अपेक्षित आहे. एकूण उत्पादन पाचशे ते साडेपाचशे टन अपेक्षित आहे. नवती परदेशात निर्यात होईल. अगोदरही पवार यांची केळी निर्यातदारांमार्फत आखाती देशात निर्यात झालेली आहे.

Sharad Pawar's farms of half a million liters. In the second photo, a banana garden.
Positive News : 87 वर्षीय आजींनी दिली सैनिकांना 5 लाखाची भेट! वाढदिवसाच्या कार्यक्रमांना फाटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com