esakal | बापरे..आठवड्यात १३८ मृतांवर अंत्यसंस्कार; दोन शिफ्टमध्ये कर्मचारी

बोलून बातमी शोधा

corona death
बापरे..आठवड्यात १३८ मृतांवर अंत्यसंस्कार; दोन शिफ्टमध्ये कर्मचारी
sakal_logo
By
टिम इ सकाळ

धुळे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे मृत्युदर (corona death ratio) वाढला आहे. या कठीण स्थितीत हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामागील (dhule medical collage) खासगी जागेतील अंत्यविधीस्थळी महापालिकेचे कर्मचारी २४ तास कर्तव्य निभावत आहेत.

१८ ते २४ एप्रिल या कालावधीत एकूण १३८ रुग्णांचा अंत्यविधी झाला. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये पाच कर्मचारी कार्यरत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या अंत्यविधीसाठी विनामूल्य लाकडे, गवऱ्या आणि नातेवाइकांसाठी पीपीई किट पुरविण्यात येत आहेत. तसेच २४ तास पाण्याच्या टँकरची व्यवस्था आहे. अंत्यविधीसाठी दोन ओटे बांधले आहेत. अंत्यविधीसाठी सामाजिक बांधिलकीतून विविध संस्था, दानशूर व्यक्तींकडून लाकडाचा पुरवठा केला जात आहे. यात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून महापालिका सर्वतोपरी काळजी घेत आहे. सहाय्यक आरोग्य अधिकारी लक्ष्मण पाटील देखरेख करीत आहेत.

हेही वाचा: नियम लावूनही एकेनात..दहा दुकानांना लावले सील

नातलग नाही, पण ते करताय अंत्‍यसंस्‍कार

अनेकदा मृतांचे नातेवाईक भितीअभावी अंत्यविधीसाठी पुढे येत नाहीत. या स्थितीत महापालिका कर्मचारी विधिवत अंत्यसंस्कार करीत आहेत. याकामी महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.