esakal | नियम लावूनही एकेनात..दहा दुकानांना लावले सील

बोलून बातमी शोधा

shahada palika
नियम लावूनही एकेनात..दहा दुकानांना लावले सील
sakal_logo
By
टिम इ सकाळ

शहादा (नंदुरबार) : कोविड नियमांचे उलंघन (coronavirus) करणाऱ्या दहा दुकानदारांवर (ता. ४) गस्तीवर असलेल्या पथकाने कारवाई केली. त्यात सहा किराणा व इतर चार दुकानांचा (shop) समावेश आहे. तसेच एका कापड दुकानावर धडक कारवाई करत दंड करुन दुकान सील करण्यात आले. (shahada palika action shop not rules follow)

हेही वाचा: अफवांचा पेव म्‍हणून घरच्यांचा विरोध; तीने मात्र झुगारला अन्‌ केले लसीकरण

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न वेळोवेळी करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कोरोना संसर्गाबाबत नियमांचे काटेकोर पालन करून सहकार्य करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन करावे, असे निर्देश वेळोवेळी प्रशासनातर्फे देण्यात येत आहेत. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तत्काळ सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी राहुल वाघ व पथकाने शहरातील जत्रा कापड दुकानास सिल लावून कार्यवाही केली आहे. या दरम्यान भरारी पथकात कार्यालयीन पर्यवेक्षक माधव गाजरे, अभियंता संदिप टेंभेकर, स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, करनिरीक्षक राजेंद्र सैंदाणे, नगरपरिषदेतील दिलीप कोळी, पुरुषोत्तम शिवदे, सुनील भारती, चेतन गांगुर्डे, गोटूलाल तावडे, निंबा बढे, अजिंक्य डोडवे, खलील शेख, ब्रिजलाल पाटील, समिर शेख तसेच नगर्परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मार्फत प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली.

हेही वाचा: हॉटस्‌ॲप ग्रुपच्या नावाप्रमाणे जोपासली बांधिलकी; ३ लाख ८० हजार निधी संकलन

१५ हजार दंड वसूल

कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एकूण १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला गेला व यापुढे कडक कारवाई करण्यात येणार असून कारवाईचे उल्लंघन केल्यास पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत आस्थापना सील केल्या जातील. पोलिसांसोबत पालिकेची भरारी पथके तयार करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक आणि फौजदारी कारवाया करण्यात येणार आहेत. तसेच मुख्य बाजारपेठा याठिकाणची गर्दी टाळण्यासाठी संयुक्तिक कारवाई करण्यात येणार आहेत. किराना दुकान व इतर आस्थापना याठिकाणी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी असेल तर अशांवर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच कोरानाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत या आस्थापना सील करण्याचा निर्णय सुध्दा भविष्यात घेण्यात येईल कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक, फौजदारी अशा दोन्ही कारवाया करण्यात येणार आहेत. असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

नागरिकांनी बाजारात विनाकारण गर्दी करू नये, ज्या आस्थापना उघडण्यास नियमानुसार परवानगी आहे त्यांनीच आपले आस्थापना नेमून दिलेल्या वेळेत उघडून वेळेतच बंद कराव्यात. दुकानांवर गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन प्रशासनास सहकार्य करावे.

- राहुल वाघ, मुख्याधिकारी, शहादा नगर परिषद.