esakal | पितळचे सोने करत घेतले कर्ज; पितळ पडले उघडे
sakal

बोलून बातमी शोधा

gold loan

सोने तारण कर्ज प्रकरणात अधिकृत मुल्यांकन कर्ता मे. दिनानाथ एस. सराफ दोंडाईचा यांनी कर्ज मागणी करणाऱ्या संबंधितांना अहवाल देताना सोने पूर्णपणे बनावट आहे.

पितळचे सोने करत घेतले कर्ज; पितळ पडले उघडे

sakal_logo
By
संदाशिव भालकर

दोंडाईचा (धुळे) : बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत बनावट सोने तारण कर्जासाठी देऊन एक कोटी ४५ लाख ४७ हजार 226 बॅंकेला गंडा घातला आहे. बनावट सोन्याला खरे सोन्याचे मुल्यमापन प्रमाणपत्र देणाऱ्या सराफ दुकादारासह अन्य 32 सोनेतारण कर्जदारांनी संगनमताने बॅंकेचा विश्वासघात केला. या प्रकरणी जळगाव येथील क्षेत्रीय प्रबंधक राजेश दतात्रय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. 34 जणांच्या विरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराफ दुकानदाच्या मुलास व वडील यांना धुळे येथील अर्थीक गुन्हे शाखा अन्वेषण विभागाने अटक केल्‍याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी दिली. याबाबत सविस्तर माहिती अशी की येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत 5 फेब्रुवारी 2015 पासून ते 25 सप्टेंबर 2019 या कालावधीत वेळोवळी खोटे व दिशाभूल करणारे सोने तारण कर्ज मूल्यमापन अहवाल बँक ऑफ महाराष्ट्रला दिले होते. मूल्यमापन अहवालावर अवलंबून बँकेने कर्जदारांना कर्ज दिले आहे. 

खोट्या दागिन्यांच्या मोबदल्‍यात
सोने तारण कर्ज प्रकरणात अधिकृत मुल्यांकन कर्ता मे. दिनानाथ एस. सराफ दोंडाईचा यांनी कर्ज मागणी करणाऱ्या संबंधितांना अहवाल देताना सोने पूर्णपणे बनावट आहे. अत्यंत नगण्य किंमतीचे खोट्या दागिन्यांच्या मोबदल्यात 1 कोटी 45 लाख 47 हजार 226 एवढ्या रक्कमेची बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेची फसवणूक झाली. स्वत: मुल्यांकन कर्ता संदीप सराफ व मुलगा ऋषभ सराफ यांनीही प्रत्येकी दोन - दोन कर्ज घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

बनावट सोन्याचे असे पितळ पडले उघडे
बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य कार्यालय पुणे यांच्या 19 सप्टेबर 2019 च्या पत्र्याच्या सुचना होत्या. प्रत्येक शाखेतील सोनेतारण कर्जातील तारण ठेवलले सोन्याची फेरमूल्यांकन तपासणी करावी. त्यानुसार मे नक्षत्र नंदीनी ज्वेलर्स दोंडाईचा यांना क्षेत्रीय कार्यालय जळगावकडुन नेमण्यात आले. 14 फेब्रुवारी ते 14 मार्च 2020 या कालावधीत बॅंकेत ठेवलेल्या सोन्याची तपासणी पूर्ण केली. त्यात 41 सोने तारण कर्ज खात्यातील दागिने पूर्णपणे बनावट असल्याचे आढळून आले. एकुण 64 सोने तारण कर्ज खात्याची फेरतासणी झाली. त्यात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे आता पुन्हा परिसरातील सोन्याला कस लावावा जाणार आहे.

सदर प्रकरणात कोण दोषी आढळतात याचीही चौकशी केली जाणार आहे असे आर्थिक गुन्हे शाखेने म्हटले आहे. सोन्यांचे मुल्यांकन करून देणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेतले आहे. यात बॅंकेतील अधिकारींचीही चौकशी केली जाईल. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
- हेमंत बेंडाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा अन्वेषण विभाग धुळे

संपादन ः राजेश सोनवणे