esakal | नात्‍याला काळीमा..डॉक्‍टर चुलतभावानेचे काढले अश्‍लील फोटो अन्‌ केला अत्‍याचार
sakal

बोलून बातमी शोधा

torture

भाऊ- बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारा हा घटनाक्रम २५ मार्च ते १३ डिसेंबरदरम्यानचा आहे. मोटारसायकलने जंगलात घेऊन गेला. तेथे बळजबरीने गळ्यात मंगळसूत्र घालून, कपाळी कुंकू भरले व छायाचित्र काढत आता तू माझी झाली,

नात्‍याला काळीमा..डॉक्‍टर चुलतभावानेचे काढले अश्‍लील फोटो अन्‌ केला अत्‍याचार

sakal_logo
By
भगवान जगदाळे

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील टेंभे (ता. साक्री) येथील वीसवर्षीय महाविद्यालयीन तरुणीची अश्‍लील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिर (ता. साक्री) येथील चुलतभावाने अत्याचार केला. नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेतील संशयितास निजामपूर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यास २९डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 
भाऊ- बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारा हा घटनाक्रम २५ मार्च ते १३ डिसेंबरदरम्यानचा आहे. पीडित तरुणीचा चुलतभाऊ दिनेश सरक खेडोपाडी डॉक्टर म्हणून फिरतो व गोळ्या-औषधे देतो. २५ मार्चला पीडितेला सर्दी, खोकला व ताप आल्याने तिच्या आईने दिनेशकडून तपासणी करून घेण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी (२६ मार्च) दिनेश टेंभे येथे आलेला असताना त्याला तपासणी करण्यास सांगितले. त्यावर गोळ्या- औषधे देण्याऐवजी त्याने सलाईन लावण्याचा सल्ला दिला. 

सलाईनमध्ये गुंगीचे औषध
त्यासाठी तो घरी आला तेव्हा पीडितेचे आई- वडील, भाऊ- बहीण व आजी शेतात गेले होते. सलाईन लावल्यानंतर पीडितेस गुंगी आली व पुढे काय घडले हे तिला समजलेच नाही. त्यानंतर दिनेश निघून गेला. त्यानंतर त्यानेच सलाईनमध्ये गुंगीचे औषध मिसळून नग्नावस्थेत काही छायाचित्र काढल्याचे फोनवरून सांगितले. ते ऐकताच युवती हादरली व जाब विचारला असता, त्याने पीडितेस साक्री येथे भेटण्यास बोलावले व फोटो डिलीट करण्याचे आश्‍वासन दिले. २७ मार्चला ती कुणालाही न सांगता साक्री येथे गेली. तेथे दिनेशने तिला बळजबरीने मोटारसायकलवर बसवून एका खासगी रुग्णालयात नेत दुसऱ्या माळ्यावरील खोलीत तोंड दाबून जबरदस्ती अत्याचार केले व छायाचित्र काढून व्हायरल करण्याची धमकी दिली. 

बहिणीच्या गळ्यात घातले मंगळसुत्र
त्यानंतरही त्याने वेळोवेळी व्हॉइस कॉल व व्हिडिओ कॉलद्वारे आई- वडिलांना व भावी पतीलाही छायाचित्रे पाठवण्याची धमकी देत पीडितेस बोलण्यास भाग पाडले. याच काळात जुलैमध्ये व्हिडिओ कॉल करून अंगावरील कपडे काढण्यास सांगून त्याचे स्क्रीनशॉट काढले व ते छायाचित्र १० ऑगस्टला पीडितेस पाठवून साखरपुडा मोडून त्याच्याशी संबंध ठेवण्यास धमकावले. त्यास नकार देत पीडितेचा १९ ऑगस्टला साखरपुडा झाला. त्यानंतरही शेवटची भेट घेऊन सर्व फोटो डिलीट करतो, असे सांगत त्याने पीडितेस पुन्हा साक्रीला बोलावले व मोटारसायकलने जंगलात घेऊन गेला. तेथे बळजबरीने गळ्यात मंगळसूत्र घालून, कपाळी कुंकू भरले व छायाचित्र काढत आता तू माझी झाली, असे सांगत फोटो डिलीट करण्यास नकार देत बसस्थानकावर आणून सोडले. 

असा उघडकीस आला प्रकार
दरम्यान, १३ डिसेंबरला पीडितेच्या भावी पतीने संशयिताच्या व्हाट्सॲप स्टेट्सवर तिचे छायाचित्र पाहिल्याचे फोनवरून सांगितले. याबाबत जाब विचारला असता दिनेशने तिच्या वडिलांना छायाचित्र पाठवण्याची धमकी देऊन फोन ठेवला आणि अश्‍लील फोटो, जंगलातील जबरदस्तीने केलेले लग्नाचे फोटो व्हाट्सॲपवर पाठविले. याबाबत तिच्या वडिलांनी विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याच सांगण्यावरून शुक्रवारी (ता. २५) पीडितेने निजामपूर पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिरसाठ तपास करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image