पीडित बालकांच्या आधारासाठी यंत्रणा सरसावली; विधी प्राधिकरणाचेही मिळेल सहाय्य

पीडित बालकांच्या आधारासाठी यंत्रणा सरसावली; विधी प्राधिकरणाचेही मिळेल सहाय्य
child support
child supportsakal

धुळे : कोरोना विषाणूंमुळे (Coronavirus) एक किंवा दोन्ही पालक गमावलेली बालके व त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनेचे लाभ पात्रतेनुसार तत्काळ मिळवून देत पुढील बैठकीत अहवाल सादर करावा, असा आदेश कृती दलाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी संजय यादव (Dhule collector sanjay yadav) यांनी दिला. (dhule-child-support-introduced-administrator-helpline)

child support
आश्रमशाळा इमारतींसाठी दोन वर्षांत अकराशे कोटी !

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजीसाठी स्थापन जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक झाली. अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक बी. एम. मोहन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, तहसीलदार सुचेता चव्हाण, आशा गांगुर्डे (संगांयो), जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी शिरसाट, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी हेमंतराव भदाणे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी चव्हाण, बालविकास अधिकारी एम. एम. बागूल, निरीक्षण गृहाच्या अधीक्षक अर्चना पाटील, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अमित दुसाने आदी उपस्थित होते.

बालकांना योजनांचा द्या लाभ

जिल्हाधिकारी यादव म्हणाले, की संबंधित बालकांपर्यंत पोचून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे. अशा बालकांचे शिक्षण, उदरनिर्वाहाची काळजी घेण्यात येईल. एक पालक गमावलेल्या बालकांच्या मातेला कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षणासह प्रोत्साहित केले जाईल. पात्रतेनुसार उपगटांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निराधार योजना, बालसंगोपन योजनेचे लाभ मिळवून द्यावे. याबाबत कार्यवाही अहवाल सादर करावा.

child support
बैलजोडी चोरल्याचा आरोपावरून साक्री पं. स. सदस्याची धिंड !

जिल्‍हाधिकारींनी साधला संवाद

मुलांच्या शैक्षणिक शुल्काबाबत शाळा व्यवस्थापनांशी संवाद साधण्यात येईल. घर नावावर करणे, वारस नोंदविण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात यावा. कुटुंब निवृत्तिवेतन योजनेचा लाभ मिळवून द्यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी पीडित बालकांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. श्री. दास, श्री. मोहन, ॲड. दुसाने, प्रा. वैशाली पाटील, ॲड. मंगला चौधरी, मीना भोसले यांनी सूचना केल्या.

बालकांसाठी हेल्पलाइन

दोन पालक गमावलेल्या बालकांसाठी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८, तसेच ८३०८९ ९२२२२, ७४००० १५५१८ (सकाळी ८ ते रात्री ८), किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, ५२, जयहिंद कॉलनी, सुधा हॉस्पिटलसमोर, देवपूर, धुळे (दूरध्वनी : ०२५६२- २२४७२९), बालकल्याण समिती, मुलांचे निरीक्षणगृह, साक्री रोड, धुळे येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com