बैलजोडी चोरल्याचा आरोपावरून साक्री पं. स. सदस्याची धिंड ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बैलजोडी चोरल्याचा आरोपावरून साक्री पं. स. सदस्याची धिंड !

बैलजोडी चोरल्याचा आरोपावरून साक्री पं. स. सदस्याची धिंड !

धुळे : पंचायत समितीचे सदस्यावर राजकीय द्वेषातून बैलजोडी चोरल्याचा आरोप करून त्यांना रात्रभर बांधून ठेवले. आणि सकाळी मारहाण करत गावातून धिंड काढल्याची गंभीर व संतापजन घटना धुळे जिल्ह्यातील साक्री गावात घडली. या घटने बाबत अहिल्या सेनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्याकडे दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली.

(sakri village panchayat samiti member accused theft beaten)

हेही वाचा: जिल्हा कोविड रुग्णालयात म्यूकोरमायकोसिसची चौथी शस्त्रक्रिया !

साक्री पंचायत समिती सदस्य सोपान पदमर पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले. राजकीय हेतूने त्यांना हट्टी (ता. साक्री) गावात मारहाण झाली. त्यांची धिंड काढणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी युवाशक्ती अहिल्या सेनेतर्फे जिल्हा प्रशासनाकडे मंगळवारी (ता.८) निवेदनाव्दारे झाली. या घटनेच्या निषेधार्थ सेनेच्या आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली.

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधा होणार अधिक सक्षम


निवेदनात म्हटले आहे, की साक्री पंचायत समिती सदस्य पाटील यांनी पंचायत समिती, ग्रामपंचातीत यश मिळविले. त्यांचा वाढता प्रतिसाद काहींना सहन झाला नाही. त्यामुळे त्यांना रात्री विनाकरण बांधून ठेवले. सकाळी मारहाण करत त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. त्यांच्यावर बैलजोडी चोरल्याचा आरोप झाला. त्यांना निजामपूर पोलिसात नेण्यात आले. मात्र, नंतर ती बैलजोडी कोणाची याबाबत माहिती देण्यास कोणीही पुढे आले नाही. चोरीची घटनाच घडलेली नाही. त्यामुळे पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंदवला गेला नाही. सोपान पाटील यांच्या फिर्यादीवरून त्यांना मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध घेवून कठोर कारवाई करावी. अन्यथा, युवाशक्ती अहिल्या सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा सेनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज कोळेकर, किशोर अलोर, सोपान पाटील, भावराव मासुळे, प्रवीण निळे, संजय सरग, देवा मासुळे, सुभाष मासुळे आदींनी दिला.

Web Title: Marathi News Sakri Village Panchayat Samiti Member Accused Theft

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..