जिल्‍हाधिकारींची उन्‍हात चार किमी पायपीट; रोहयो कामांची पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dhule collector sanjay yadav

जिल्‍हाधिकारींची उन्‍हात चार किमी पायपीट; रोहयो कामांची पाहणी

शिरपूर (धुळे) : तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागात (tribal areas) तब्बल चार किलोमीटर पायपीट करत जिल्हाधिकारी संजय यादव (Dhule collector sanjay yadav) यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. शनिवारी (ता.२१) त्यांच्या दौऱ्यात सहभागी झालेल्या विविध अधिकाऱ्यांना ग्रामस्थ मागतील त्याप्रमाणे ग्रामीण भागात तातडीने कामे उपलब्ध करून द्यावी अशा सूचना दिल्या. (dhule collector sanjay yadav tour tribal arias)

सकाळी आठपासून यादव यांनी दौऱ्याला सुरुवात केली. हाडाखेड येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. लसीकरणाबाबत गैरसमज दूर करावेत, स्वतःसह इतरांनाही लसीकरण करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले. सांगवी येथे नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी भेट दिली. केंद्रासाठी आवश्यक सोयी सुविधांबाबत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य योगेश बांदल यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तेथून जिल्हाधिकारी सहकाऱ्यांसह दुर्बळया येथे रवाना झाले.

हेही वाचा: कोविडच्या रणसंग्रामात ३१ शिक्षक योध्दांनी गमावला जीव

वनविभागाच्या हद्दीत पायपीट

तेथील वनविभागाच्या हद्दीत सुरू असलेल्या रोहयोच्या कामांची पाहणी करताना त्यांनी परिसरात तब्बल चार किलोमीटरचा पायी फेरफटका मारला. तेथील समतल चर (सीसीटी) कामावरील मजुरांशी संवाद साधून त्यांना रोजगार व इतर सुविधा मिळत असल्याबाबत त्यांनी खात्री करून घेतली. मजुरांनी लसीकरण करून घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील वैद्यकीय सोयी सुविधांची पाहणी त्यांनी केली.

पोषण आहाराबाबत चौकशी

गावात रोहयोअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलाच्या कामांना जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. या परिसरातील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यासाठी स्तनदा माता, गर्भार स्त्रिया यांना वेळेवर व पुरेसा पोषण आहार द्यावा, सध्या कोरोनामुळे पोषण आहार शिजवून जागेवर न देता संबंधितांना दिला जातो, मात्र पोषक घटकांचे सेवन संबंधित स्त्रियांकडूनच होत असल्याची खात्री करावी असे निर्देश त्यांनी दिले. गुऱ्हाळपाणी येथील विस्तारित आरोग्य कक्ष व प्रसूतिगृहाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. जिल्हाधिकारी यादव यांच्यासह उपजिल्हाधिकारी गोविंदा दाणेज, उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रमसिंह बादल, तहसीलदार आबा महाजन, वन उपसंरक्षक अमितराज जाधव, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्न कुलकर्णी, सांगवी पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाट, सांगवी वनक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी आनंद मेश्राम, स्वामी विवेकानंद रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद माळी आदी उपस्थित होते.

loading image
go to top