esakal | घोडा ना वराती..साध्या पद्धतीने का होईना लग्नसराई जोरात..आता डिजिटलच लग्नपत्रिका
sakal

बोलून बातमी शोधा

marriage

गत वर्षे दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाह संपन्न झाला. यानंतर मोठ्या प्रमाणात लगीनघाई सुरू होणार होती. काही प्रमाणात झाल्‍या देखील. आता काही समस्‍या नाही म्‍हणून अनेकांनी पत्रिका छापल्या होत्या.

घोडा ना वराती..साध्या पद्धतीने का होईना लग्नसराई जोरात..आता डिजिटलच लग्नपत्रिका

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी (धुळे) : गेल्या आठ महिन्यापासून देशावर आलेल्‍या कोरोनाचे संकट घोंगत असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून टाळेबंदी करण्यात येत आहे. अनेकांची लग्नांचे मुहूर्त हुकले होते. परंतु प्रशासनाकडून विवाह सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्यामुळे सर्वत्र सध्या साध्या पद्धतीने लग्न घाई उरकून घेतली जात आहे. ना घोडा ना वराती..अगदी कमी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्‍न पार पाडले जात आहेत.

गत वर्षे दिवाळी झाल्यानंतर तुळशी विवाह संपन्न झाला. यानंतर मोठ्या प्रमाणात लगीनघाई सुरू होणार होती. काही प्रमाणात झाल्‍या देखील. आता काही समस्‍या नाही म्‍हणून अनेकांनी पत्रिका छापल्या होत्या. मात्र ऐन हंगामात कोरोनाने पुन्हा थैमान घातले. हिच परिस्‍थिती मागील वर्षी होती. मार्चमध्ये संपूर्ण देशभर टाळेबंदीने सारेजण स्तब्ध झाले. यामुळे सर्व आखलेल्या कार्यक्रमांना, मुहूर्तांना मुकावे लागले. 

पाच महिन्यानंतर गजबज
तब्बल पाच महिने कोणतेच कार्यक्रम सार्वजनिकपणे साजरे करता आले नाही. यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येवू लागले आणि शासनाने काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात घ्यावयाच्या काळजीच्या अधीन राहून शिथिलता आणली. त्यामुळे काढलेले लग्राचे मुहूर्त आता नव्याने काढून लग्नास सुरुवात झाली आहे. परंतु, पुन्हा एकदा कोरोनाचा थैमान सुरू झाल्‍याने परिस्‍थिती गंभीर होत चालली आहे. यामुळे पुन्हा एकदा निर्बंध आणले गेले आहेत.

निमंत्रण झाले डिजीटल
सध्या मोबाईलची युग सुरू आहे. आज प्रत्येकाकडे ॲड्राइड मोबाईल पाहायला मिळतो. टाळेबंदीमध्ये तर मोबाईल हेच सर्वांचे जवळचे साधन बनले होते. भेटीगाठी बंद झाल्याने फोन एकच आधार बनला होता. तर विविध कंपन्या मंडळी संस्थांनी मोबाईलच्या माध्यमातून मीटिंग घेतल्यानंतर जूनपासून शालेय शिक्षण ऑनलाईन मोबाईलद्वारे अजून देखील सुरू आहे. इतकेच नव्हे तर लग्‍नाच्या पत्रिकांचे वाटप आता प्रत्‍येकाच्या घरी जावून केले जात नसून, डिजीटल स्‍वरूपातील पत्रिका व्हॉटस्‌ॲपवर पाठवून डिजीटल पद्धतीने निमंत्रण देण्यात येत आहे. लग्नाचे निमंत्रण पाहुण्यांना देऊ लागले असल्याचे मानले जात आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image