esakal | साक्रीचा भूमीपुत्र नाशिकमध्ये रूग्णमित्र

बोलून बातमी शोधा

doctor
साक्रीचा भूमीपुत्र नाशिकमध्ये रूग्णमित्र
sakal_logo
By
टिम इ सकाळ

साक्री (धुळे) : कोरोना महामारीत रूग्ण आणि रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी रूग्णांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत नवीन ठिकाणी भेदरलेल्या रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रूग्णमित्र बनून साक्रीचा भूमीपुत्र डॉ. प्रतिक देवरे नाशिक येथे खासगी तसेच सरकारी रुग्णालयात अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहे. यामुळे केवळ तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याबाहेरील कोरोनाग्रस्तांना दिलासा मिळत आहे.

डॉ. देवरे यांनी यापूर्वी साक्री तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ५ वर्षे रुग्णसेवा केली. यासेवा काळातही त्यांनी तालुक्यातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या. वैद्यकीय सेवेचे हे व्रत अखंड सुरू ठेवत, गेल्या दोन वर्षांपासून अर्थात कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आताच्या दुसऱ्या लाटे दरम्यान साक्री तालुक्यातीलच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून उपचारासाठी आलेल्या शेकडो कोरोना रुग्णांना नाशिक येथे खासगी तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे, उपचारादरम्यान ब्लड, प्लास्मा मिळवून देणे, मोफत वैद्यकीय मार्गदर्शन व सल्ला देणे आदि अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत. आपल्या ग्रामीण भागातील गोर-गरीब, अशिक्षित रुग्णांना नाशिक येथे आरोग्यासेवेच एक हक्काच ठिकाण उपलब्ध करून दिले आहे. डॉ. प्रतिक देवरे हे साक्री येथील ज्येष्ठ विधितज्ञ ॲड. व्ही. एन. देवरे व माजी मुख्याध्यापिका आशा हिरे-देवरे यांचे चिरंजीव तर नवडणे येथील कृषीभूषण कै. राजेंद्र ठाकरे यांचे जावई आहेत.

कोरोना महामारीत रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी कुणीतरी मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. रूग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानीत, जमेल तेवढे काम स्वतः करून यापुढील काळात देखील कुणाला नाशिक शहरात आरोग्यविषयक मदत लागल्यास संपर्क साधावा.

- डॉ. प्रतिक देवरे