विनामास्क फिरणाऱ्या ५२ जणांवर कारवाई; सोनगीर दहा हजार रुपये दंडवसुली 

no mask use
no mask use

सोनगीर (धुळे) : विनामास्क फिरणाऱ्या ५२ जणांवर मंगळवारी (ता. २३) दंडात्मक कारवाई करत प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे दहा हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले. ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली. वसुली पथकाशी अनेकांनी दंड देताना बाचाबाची केली. दरम्यान, ही कारवाई सुरूच राहील, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक उमेश बोरसे व ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे यांनी सांगितले. 
सोनगिरमध्‍ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जुलै २०२० मध्ये रुग्णसंख्येने शतक गाठले होते. अनेकांचा मृत्यू झाला होता. जुलै व ऑगस्टमध्ये सरासरी रोज एक कोरोना रुग्ण आढळून येत होता. त्याला आळा घालण्यासाठी लॉकडाउन व अन्य उपाययोजना केल्या. सध्या कोरोना पुन्हा डोके वर काढत असून, जिल्हाधिकारी संजय यादव व पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सर्वांना मास्क लावणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार येथे मास्क लावणे बंधनकारक असून, नियम मोडणाऱ्यांना दोनशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. 

येथे झाली कारवाई
बाजारपेठ, महात्मा फुले चौक, गांधी चौक, बागूल गल्ली, बजरंग चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अकबर चौक, बसस्थानक, पोलिस ठाणे आदी ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. सोमवारी (ता. २२) सहा दुकानदारांकडे प्लॅस्टिकच्या पिशव्या, तर सहा जण विनामास्क आढळल्याने १२ जणांवर प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे दोन हजार ४०० रुपये दंडवसुली केली होती. दोन दिवसांत आठ हजार आठशे रुपये दंड वसूल झाला असून, तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणार आहे. ग्रामविकास अधिकारी उमाकांत बोरसे, छोटू बडगुजर, दिलीप माळी, शुभम तांबट, तसेच पोलिस ठाण्याचा तात्पुरता प्रभार असलेले सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे, पोलिस शिपाई सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, अतुल निकम यांनी कारवाईत सहभाग घेतला.

धुळ्यात नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई 
धुळे शहरात विनामास्क फिरणाऱ्यांसह कर्णकर्कश आवाज काढत फिरणाऱ्या व वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांवर मंगळवारी (ता.२३) पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलला. या कारवाईत दुचाकीस्वारांकडून दिवसभरात आठ हजार रुपये दंड वसूल केला. दरम्यान, कारवाईबरोबरच विनामास्क फिरणाऱ्या काहीजणांना स्वतः मास्क लावत काळजी घेण्याचेही आवाहन पोलिसांनी केले. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका असताना नागरिक नियम मोडून बिनधास्तपणे फिरत आहेत. अशा बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी आज कारवाईचा बडगा उचलला. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख व पथकाने पांझरा नदी काठी कारवाई केली. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसह काही तरुणांना स्वतः मास्क घालत बाहेर पडल्यावर मास्क लावण्याचे आवाहनही केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com