esakal | डॉक्टर आपल्या दारी मोहिमेमुळे घटला कोरोनाचा टक्का
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

डॉक्टर आपल्या दारी मोहिमेमुळे घटला कोरोनाचा टक्का

sakal_logo
By
टीम ई सकाळ

शिरपूर (धुळे) : ग्रामीण भागातील कोरोनाचा साथसंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने (state health department) सुरू केलेल्या डॉक्टर आपल्या दारी अभियानातील वैद्यकीय पथकांनी तालुक्यात लक्षणीय (Dhule corona update) कामगिरी बजावली आहे. सुपर स्प्रेडर हुडकून काढण्यासह तपासणी, निदान आणि उपचार या त्रिसूत्रीद्वारे कोरोनावर नियंत्रण राखण्यात या पथकामुळे आरोग्य विभागाला मोठे यश प्राप्त झाले. (dhule-news-coronavirus-update-doctor-home-team-recovery-rate-up)

१५ मे पासून तालुक्यात डॉक्टर आपल्या दारी मोहिमेला सुरुवात झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व दोन्ही उपलब्ध नसल्यास जिल्हा परिषद शाळा (Zilha parishad school dhule) यांच्या आवारात आरोग्य तपासणी करण्यात येते. बाहेरून गावात आलेल्या व्यक्ती, पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटुंबातील सदस्य, लक्षणे जाणवत असलेले व तपासणीसाठी इच्छुक आदी घटकांचे नमुने घेऊन आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातात. अहवालानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना सौम्य, मध्यम व तीव्र लक्षणांनुसार उपचारासाठी संदर्भित केले जाते. गावात येऊन नमुने घेण्याची सुविधा व तज्ज्ञ डॉक्टर्सकडून होणाऱ्या जनजागृतीमुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद अनेकपटीने वाढला आहे.

ग्रामीण भागात बरे होण्याचे प्रमाण वाढले

रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावांमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्यातही या पथकांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. या पथकाला आरटी-पीसीआर चाचणीसाठी नमुने घेण्याच्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे १० दिवसांत या पथकाने तब्बल ६०१ नमुने घेतले. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण बरे होण्याची सरासरी ९७.१५ टक्के आहे. या मोहिमेसाठी जिल्हा परिषदेच्या सीईओ वान्मती सी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, तहसीलदार आबा महाजन, गटविकास अधिकारी युवराज शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे.

ग्रामस्थांची मानसिकता लक्षात घेऊन पथके कामाची पद्धत अवलंबतात. त्यामुळे उत्तम प्रतिसाद लाभतो. वेगाने तपासणी करून रुग्ण व त्यांच्यावरील उपचारांची निश्चिती करण्यात येत आहे. लसीकरणातही ग्रामीण भागात लक्षणीय कामगिरी बजावण्यात यश मिळाले. कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्याचा वेग आणखी वाढवणार आहोत.

-डॉ. प्रसन्न कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी