esakal | धुळे जिल्ह्यात तब्बल ७५ बाधित 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

राज्यभरात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढत आहे. यात धुळे जिल्ह्यातील चित्रही दिवसेंदिवस चिंता निर्माण करणारे आहे. १८ फेब्रुवारीला २८ बाधित समोर आल्यानंतर धोक्याची घंटा वाजली.

धुळे जिल्ह्यात तब्बल ७५ बाधित 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे आज (ता.२२) पुन्हा अधोरेखित झाले. आज जिल्ह्यात तब्बल ७५ कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने यंत्रणेच्याही चिंतेत भर पडली. विशेष म्हणजे ७५ पैकी ५०-६० बाधित हे धुळे महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यातही देवपूर भागात बाधितांची संख्या जास्त असल्याचे दिसते. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १५ हजार २१७ वर पोहोचली. 

राज्यभरात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढत आहे. यात धुळे जिल्ह्यातील चित्रही दिवसेंदिवस चिंता निर्माण करणारे आहे. १८ फेब्रुवारीला २८ बाधित समोर आल्यानंतर धोक्याची घंटा वाजली. त्यानंतर १९ फेब्रुवारीला ३८ तर २० फेब्रुवारीला जिल्ह्यात ५८ बाधित समोर आले. दरम्यान रविवारी (ता.२१) हा आकडा १६ पर्यंत खाली आल्याने दिलासा मिळाला खरा पण आज (ता.२२) बाधितांच्या संख्येने थेट ७५ पर्यंत मजल मारल्याने चिंतेत भर पडली आहे. आजच्या बाधितांमध्ये सुमारे ६० बाधित हे धुळे महापालिका क्षेत्रातील आहेत. त्यातही देवपूर भागात विशेषतः प्रोफेसर कॉलनी व परिसरातील बाधितांची संख्या जास्त असल्याचे दिसते. सोमवारी जिल्ह्यातील बाधित असे ः जिल्हा रुग्णालय धुळे (१३४ पैकी ३३), उपजिल्हा रुग्णालय शिरपूर (५४ पैकी ०१), उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा (०४ पैकी ०२), भाडणे साक्री कोविड केअर सेंटर (५७ पैकी ०४), महापालिका कोविड केअर सेंटर (७६ पैकी ०१), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे (३० पैकी ००), खासगी लॅब (६० पैकी ३४).