esakal | मंत्रालयात आत्‍महत्‍या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या कुटूंबाला अजूनही फेऱ्याच; आठ दिवसांत निर्णयाचे आश्‍वासन
sakal

बोलून बातमी शोधा

dharma patil family

शासनाने योग्य मोबदला दिला नाही म्हणून त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. मात्र, अद्याप मोबदला मिळाला नसल्याने त्यांची पत्नी सखूबाई व मुलगा नरेंद्र पाटील यांनी २६ जानेवारीला इच्छामरणाची परवानगी मागितली होती.

मंत्रालयात आत्‍महत्‍या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या कुटूंबाला अजूनही फेऱ्याच; आठ दिवसांत निर्णयाचे आश्‍वासन

sakal_logo
By
विजयसिंग गिरासे

चिमठाणे (धुळे) : देवाचे विखरण (ता. शिंदखेडा) येथील धर्मा पाटील यांची जमीन दोंडाईचा औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी २०१२ अधिग्रहीत करण्यात आली होती. शासनाने योग्य मोबदला दिला नाही म्हणून त्यांनी मंत्रालयात आत्महत्या केली होती. मात्र, अद्याप मोबदला मिळाला नसल्याने त्यांची पत्नी सखूबाई व मुलगा नरेंद्र पाटील यांनी २६ जानेवारीला इच्छामरणाची परवानगी मागितली होती. याबाबत सोमवारी (ता. २५) सकाळी अकराला दोंडाईचा येथील अप्पर तहसीलदार कार्यालयात शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, अपर तहसीलदार सुदाम महाजन व नरेंद्र पाटील यांची बैठक होऊन आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे अश्‍वासन देत इच्छामरण परवानगीस स्थगिती देण्यात आली. 

कुटूंबाचीही इच्छामरणाची मागणी
विखरण येथील (कै.) धर्मा पाटील यांच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाची पाच एकर जमिनीत आब्यांची झाडे, विहीर, कूपनलिका व पाइपलाइन यांसह संपादन केले आहे. तरी सपांदन केलेल्या जमिनीचा मोबदला म्हणून चार लाख एवढी रक्कम धर्मा पाटील यांना मिळाली होती. धर्मा पाटील हे वारंवार मंत्रालयात जाऊन तगादे लावूनही पुरेसा मोबदला मिळाला नसल्याने त्‍यांनी मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर शासनाकडून ४८ लाख सानुग्रह अनुदान मिळाले. पत्नी सखूबाई पाटील व मुलगा नरेंद्र पाटील यांना सानुग्रह अनुदान नको आहे. त्यामुळे पत्नी सखूबाई पाटील व मुलगा नरेंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडे २६ जानेवारीला इच्छामरणाची परवानगी मागितली होती. 

आता लेखी आश्‍वासन
जिल्हाधिकारी यादव यांच्या आदेशान्वये शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल व दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दोंडाईचा येथे नरेंद्र पाटील यांची संयुक्त बैठक होऊन आठ दिवसांत जिल्हाधिकारी यादव हे शासनाकडे मागण्या सादर करणार असल्याने नरेंद्र पाटील यांचे समाधान झाल्याने कुठलेही अनुचित प्रकार घडणार नाही, असे लेखी आश्र्वासन नरेंद्र पाटील यांनी दिले आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे