esakal | लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करा; मनपा प्रशासनाचे नगरसेवकांना आवाहन 
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांसह खासगी हॉस्पिटल्समध्येही नागरिकांची कोरोनावरील लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. दुसरीकडे मात्र, शहरातील अल्पसंख्याक भागातील नागरिक लसीकरणाला फारसे पुढे येत नसल्याचे चित्र आहे.

लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करा; मनपा प्रशासनाचे नगरसेवकांना आवाहन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

धुळे : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजनांबरोबरच कोविड-१९ लसीकरणही सुरू आहे. मात्र, अल्पसंख्याक भागातून लसीकरणासह तपासणीला प्रतिसाद मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने आज (ता.२३) अल्पसंख्याक भागातील नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांनी कोरोना लसीकरणासह तपासणीसाठी सहकार्याचे आश्‍वासन प्रशासनाला दिले. कोरोना लसीकरणासाठी शहराच्या इतर भागातून नागरिक गर्दी करत असले तरी अल्पसंख्याक भागातून प्रतिसाद नसल्याचा विषय ‘सकाळ'ने मांडला होता. 

महापालिकेच्या लसीकरण केंद्रांसह खासगी हॉस्पिटल्समध्येही नागरिकांची कोरोनावरील लस घेण्यासाठी गर्दी होत आहे. दुसरीकडे मात्र, शहरातील अल्पसंख्याक भागातील नागरिक लसीकरणाला फारसे पुढे येत नसल्याचे चित्र आहे. २१ मार्चला ‘सकाळ'ने हा विषय मांडला होता व यासाठी प्रशासनाकडून जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली होती. 

नगरसेवकांना आवाहन 
शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घेऊन कोरोना संसर्गाचा वेग कमी करणे गरजेचे असल्याने तसेच अल्पसंख्याक भागात लसीकरण व तपासणीसाठी मिळत नसलेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक भागातील सर्व नगरसेवकांची आज (ता.२३) महापालिकेच्या सभागृहात बैठक घेण्यात आली. महिला बालकल्याण समिती सभापती वंदना थोरात, विरोधी पक्षनेते साबीर शेठ, नगरसेवक अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. पल्लवी रवंदळे, नगरसेवक अमीन पटेल, वसीम बारी, उमेर अन्सारी, सद्दाम हुसेन तसेच मुख्तार बिल्डर, वसीम मंत्री, आसिफ मोमीन, अमीर पठाण, मुख्तार मन्सुरी आदी उपस्थित होते. महापालिकेतर्फे लसीकरण केंद्र तसेच स्वॅब तपासणीची पथकांची नियुक्ती आहे. त्यामुळे लसीकरणासह स्वॅब तपासणीसाठी आपापल्या भागातील नागरिकांचे प्रबोधन करावे, त्यांना लसीकरण व स्वॅब तपासणीसाठी प्रवृत्त करावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त श्री.गिरी यांनी नगरसेवकांना केले. उपस्थित नगरसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. 
 

loading image