esakal | भाजीचा तडका महागला; खाद्य तेलाची दरवाढ सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

oil

एकीकडे खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होत आसताना दुसरीकडे भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रिसाठी येत असल्याने त्‍याचे भाव गडगडले आहेत. तर दिवाळीमध्ये वाढलेले खाद्य तेल दिवाळी झाली तरीही कमी होताना दिसत नाही.

भाजीचा तडका महागला; खाद्य तेलाची दरवाढ सुरुच

sakal_logo
By
महेंद्र खोंडे

तऱ्हाडी (धुळे) : अवकाळी पाऊस त्यात उत्पादनात घट परीणामी त्यात खाद्यतेलासह इत्तर वस्तुंचे भाव वाढले. तेलाच्या भाववाढीचा परीणाम इत्तर वस्तुवर देखील पडत आहे. कोरोनामुळे आनेकांचे रोजगारही गेले. असे लोक आपल्या गावी परतले आहेत. मिळेल ते काम करुन उपजिविका भागवित आहेत. असे आसतानाच दुसरीकडे खाद्यतेलासह जिवनाश्यक वस्तुचे दर वाढतच चालले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असून या वाढलेल्या भाववाढीमुळे ग्राहकामधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

एकीकडे खाद्यतेलाच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होत आसताना दुसरीकडे भाजीपाला मोठ्या प्रमाणात विक्रिसाठी येत असल्याने त्‍याचे भाव गडगडले आहेत. तर दिवाळीमध्ये वाढलेले खाद्य तेल दिवाळी झाली तरीही कमी होताना दिसत नाही. कोरोना महामारी आणि त्यातच परत अतिवृष्टीमुळे झाल्यामुळे भाज्याचे दर कडाडले होते. त्यात भर म्हणून कि काय खाद्य तेलाचीही भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे अनेकांच्या स्वयंपाक घरातील आर्थिक नियोजन बिघडले आहे. मात्र बाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक वाढत असल्याने भाज्याचे भाव स्थिरावत आहेत. हिवाळ्यामध्ये भाजीपाल्याचे भाव अजुनही कमी होतील असे व्यापाऱ्यांचे म्‍हणणे आहे. बाजारातील चढ उताराचा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचा जास्त लाभ होतो. तर खाद्य तेलावर माञ काहीही परीणाम झाला नसुन या वाढलेल्या तेलाला परीणाम म्हणून खरेदी करताना ग्राहक दहावेळेस विचार करत आहे. 

दिवाळीच्या आगोदर किराणा सामानात सोयाबीन तेलाच्या दरात किलोमागे दहा रुपये वाढलेले होते. दिवाळी झाली तरीही कमी न होता भाव हे वाढतच आहेत. आता परत यामध्ये दहा रुपयांची वाढ होऊन वीस रुपये झाली आहे. 
- किराणा दुकानदार

सर्व खाद्यतेलाच्या किंमती कमी-अधिक होत्‍या. परंतु, दिवाळीनंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे खरेदीदारामध्येही मोठा परीणाम झाला आहे. तेल महाग झाले तरी घेतल्याशिवाय प्रर्याय नाही. पण आता मात्र काटकसरीने वापर करावा लागत असून खर्च भागवावा लागत आहे.
- रत्नाबाई कंरके, गृहिणी

संपादन ः राजेश सोनवणे

loading image