ग. स. बँकेवर लोकमान्यची एकहाती सत्ता; अपक्षांचा धुव्वा 

रमाकांत घोडराज
Monday, 25 January 2021

निवडणुकीत ग. स. बँक बचाव आंदोलनाचे प्रमुख माजी संचालक राजेंद्र शिंत्रे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे लोकमान्य पॅनल विरुद्ध अपक्ष अशीच लढाई होती.

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी कर्मचाऱ्यांची सहकारी बँक अर्थात ग. स. बँकेच्या २१ पैकी १७ संचालक निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत लोकमान्य पॅनलने सर्व विरोधकांचा धुव्वा उडवला. मतदान झालेल्या सर्व १७ जागांवर लोकमान्यचे उमेदवार विजयी झाले. तत्पूर्वी पॅनलचे चार उमेदवार बिनविरोध झाले होते. त्यामुळे लोकमान्यची बँकेवर एकहाती सत्ता आली आहे. 

ग. स. बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होती. पैकी निशांत रंधे, रवींद्र खैरनार यांच्या नेतृत्वातील लोकमान्य पॅनलच्या पूर्वीच चार जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. धुळे- नंदुरबारमध्ये १३, जळगाव, नाशिक, नगर येथील प्रत्येकी एक, अशा १६ सर्वसाधारण, तर अनुसूचित जाती-जमाती संवर्गाची एक, महिला दोन, ओबीसी एक, भटक्या विमुक्त जाती संवर्गाची एक जागा होती. 

म्‍हणूनच लोकमान्य विरूद्ध अपक्ष लढाई
या निवडणुकीत ग. स. बँक बचाव आंदोलनाचे प्रमुख माजी संचालक राजेंद्र शिंत्रे यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे लोकमान्य पॅनल विरुद्ध अपक्ष अशीच लढाई होती. संचालक निवडीसाठी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर जिल्ह्यातून २२ जानेवारीला मतदान झाले. रविवारी (ता. २४) येथील क्युमाईन क्लबमध्ये सकाळी आठपासून मतमोजणी सुरू झाली. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट झाले. या निकालात लोकमान्य पॅनलने सर्व विरोधी अपक्ष उमेदवारांचा धुव्वा उडवला. पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले. 

विजयी उमेदवार असे
- सर्वसाधारण धुळे व नंदुरबार जिल्हा मतदारसंघ : रवींद्र सुकदेव अहिरे (मिळालेली मते ४,९८९), वसंत गेंदा चव्हाण (५,०४१), प्रदीप नवल देवरे (५,१०२), बबन शिवदास नगराळे (४,९७७), गमन साहेबराव पाटील (५,१०४), चंद्रशेखर साहेबराव पाटील (५,१२१), जितेंद्र नवलराव पाटील (५,०६२), नीलेश दत्तात्रय पाटील (५,०४४), सुनील तुकाराम पाटील (५,०२७), शिरीष माधवराव बिरारीस (४,९८०), प्रवीण धनराज भदाणे (५,०२७), संदीप कैलासराव मराठे (४,९२५), शशांक विश्वासराव रंधे (४,८६४). 
- महिला राखीव मतदारसंघ : सोनाली अविनाश भामरे (५,१४६), विद्या रामकृष्ण मोरे (५,०८५). 
- अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ : वसंत रामा वळवी (५,१७८) . 
- नगर जिल्हा सर्वसाधारण मतदारसंघ : भरत वामन पवार (५,४७५). 
बिनविरोध उमेदवार - आर. आर. देसले (ओबीसी), प्रकाश बच्छाव (एनटी), भूपेंद्र बाविस्कर (जळगाव सर्वसाधारण), किरण बोरसे (नाशिक सर्वसाधारण). 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news goverment servant bank lokmanya panal victory