esakal | निवडणुकीनंतर असे घडणे म्‍हणजे अचंबीतच अन्‌ तेही वर्षानुवर्षे आहे सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

आरोपप्रत्यारोपाचा फेऱ्या बंद झाल्यात. वीस हजारावर लोकसंख्या आणि सतरा सदस्यांसाठी होत असलेली निवडणूक शांततेत होणे, हे येथील सुजाण ग्रामस्थांचे आणि तरुणांच्या समजदारीचे प्रतिक असल्याचे जिल्ह्यात चर्चीले जात आहे.

निवडणुकीनंतर असे घडणे म्‍हणजे अचंबीतच अन्‌ तेही वर्षानुवर्षे आहे सुरू

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : ग्रामपंचायत निवडणूकींमध्ये वादविवाद, भांडणतंटा होणे, हे नवे नाही. काही ठिकाणी तर दंगलीही घडून येतात. पण येथे हे सर्व अजिबात घडत नाही. विशेष म्हणजे पराभूत उमेदवार प्रतिस्पर्धी विजयी उमेदवाराच्या थेट घरी जावून सत्काराची परंपरा जोपासत आहेत..अन्‌ हे केवळ खानदेशातील कापडणे गावातच वर्षानुवर्षे घडत आले आहे. ही परंपरा तरुण पिढीही जोपासत असल्याने, याचे सार्‍यांनाच अप्रुफ वाटत आले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल नुकताच लागला. महिनााभरापासून सुरु असलेला प्रचाराचा धुराळा आणि आरोपप्रत्यारोपाचा फेऱ्या बंद झाल्यात. वीस हजारावर लोकसंख्या आणि सतरा सदस्यांसाठी होत असलेली निवडणूक शांततेत होणे, हे येथील सुजाण ग्रामस्थांचे आणि तरुणांच्या समजदारीचे प्रतिक असल्याचे जिल्ह्यात चर्चीले जात आहे. दरम्यान प्रभाग सहामधील विजयी उमेदवार महेश पाटील, प्रवीण पाटील, अलकाबाई भामरे यांच्या घरी जात पराभूत उमेदवार चंदू पाटील यांनी सत्कार केला. यावेळी भागवत पाटील, हितेश बागुल, व्यापारी अरुण पाटील आदी उपस्थित होते.

सोशल मिडीयावर प्रतिक्रियांचा पाऊस
आज (ता.22) शुक्रवारी सकाळमध्ये 'कापडणे ग्रामपंचायतीवर ना पॅनल, ना कोणाचा झेंडा' या मथळ्याखाली बातमी प्रसिध्द झाली. निपक्ष आणि परखड बातमीबद्दल सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त झाल्यात. यात जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, मनोजकुमार पाटील, चंदू पाटीलच, मनोहर पाटील, पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, प्रल्हाद पाटील, भरत पाटील, भाजपाचे जिल्हा प्रसिध्द प्रमुख मोतीलाल पोतदार, जीवन पवार, गणेश पाटील, मयुर पाटील आदींनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

कापडणे हे पुरोगामी विचारसरणीचे आदर्श गाव आहे. प्राच्यविद्या पंडीत कॉ. शरद पाटील यांचा वारसा जोपासत आहेत. हे अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे.
- मोतीलाल पोतदार, जिल्हा प्रसिध्द प्रमुख भाजपा धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे