तीन उमेदवार असतानाही महाळपूरला सरपंचपद रिक्त 

विजयसिंग गिरासे
Tuesday, 16 February 2021

ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. सर्वसाधारण महिलेच्या राखीव जागेतून कमलाबाई सूर्यवंशी व जयश्री सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती.

चिमठाणे (धुळे) : शिंदखेडा तालुक्यातील शेवटच्या टप्प्यातील २१ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी सोमवारी (ता. १५) निवडणूक होऊन १९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिला, तर उपसरपंच पदासाठी ११ ग्रामपंचायतींवर महिलाच निवडून आल्या आहेत. २१ पैकी १७ ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकाही बिनविरोध झाल्या. तर महाळपूर येथील सरपंच पद रिक्त राहणार आहे. फक्त सवाई- मुकटी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. 
ग्रामपंचायत निहाय सरपंच, उपसरपंच पुढीलप्रमाणे : धांदरणे : सरपंच रणजीत पवार, उपसरपंच योगिता राजपूत. सुराय- आक्क्लकोस- कलवाडे गट : सरपंच उज्जनबाई जाधव, उपसरपंच गुलाबराव पाटील, सार्वे : सरपंच शरद पाटील, उपसरपंच पंडित भामरे. तावखेडा- चावळदे- शेंदवाडे गट : सरपंच हर्षदाबाई गिरासे, उपसरपंच पंडित निकम. परसोळे : प्रीया पाटील, उपसरपंच कपिल सोनवणे. म्हळसर- वडोदे- विकवेल : सरपंच सोनल वारूळे, उपसरपंच सोमनाथ चौधरी. बेटावद : सरपंच सुशिलाबाई कोळी, उपसरपंच पल्लवी थोरात. तामथरे : इंदूबाई गिरासे, उपसरपंच कविता चौधरी. विरदेल : सविता बेहरे, उपसरपंच तृप्ती पेंढारकर, वडदे : सीमाबाई मोरे, उपसरपंच माधुरी कोळी, मुडावद- भिलाणे- दिगर : सरपंच रत्नाबाई शिरसाठ, उपसरपंच- सुनिता मालचे, लंघाणे : सरपंच ललिता राजपूत, उपसरपंच वैशाली सर्जेराव, महाळपूर : सरपंच रिक्त, उपसरपंच जितेंद्र पाटील, सोनशेलू : सरपंच प्रियंका बडगुजर, उपसरपंच हारसिंह राजपूत. विखुर्ले : सरपंच जनाबाई महिरे, उपसरपंच सविता बोरसे. टेंमलाय : सरपंच लताबाई मालचे, उपसरपंच पुष्पाबाई माळी. रंजाणे : सरपंच रेखा वाडिले, उपसरपंच विशवदिप राऊळ. सवाई- मुकटी : सरपंच कविता पाटील, उपसरपंच तुषार देसले. नवे कोडदे : सरपंच ज्योतीबाई पाटील, उपसरपंच भटाबाई भिल. वायपूर : सरपंच प्रतिभा पाटील, उपसरपंच दत्तात्रय पाटील. रेवाडी : सरपंच सिंधूबाई पवार, उपसरपंच संगीता भिल निवड करण्यात आली आहे. 

अर्जच करू न देण्याचा प्रकार 
महाळपूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते. सर्वसाधारण महिलेच्या राखीव जागेतून कमलाबाई सूर्यवंशी व जयश्री सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती. तसेच नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्गातून महिला राखीव जागेतून अलका निकम याही बिनविरोध निवडून आल्या होत्या. तीन पैकी एक महिला सरपंच होवू शकली असती पण एकाही महिलेला सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू दिला नसल्याचा प्रकार घडला आहे.  

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news gram panchayat sarpanch selection