esakal | क्षमता ३० ची बसविले ११५ प्रवाशी; ‘आरटीओ’कडून कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

rto cheaking

वाहनाची शयन क्षमता ३० प्रवाशी वाहतुकीची असताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असुरक्षितपणे धोकादायकरित्या प्रवाशी वाहतूक

क्षमता ३० ची बसविले ११५ प्रवाशी; ‘आरटीओ’कडून कारवाई

sakal_logo
By
विजयसिंग गिरासे

चिमठाणे (धुळे) : मुंबई- आग्रा महामार्गावर बाभळेफाटा (ता. शिंदखेडा) येथे आज पहाटे मुंबईहून बेहराईकडे (उत्तरप्रदेश) जाणारी लक्झरी बसमध्ये ३० प्रवासी क्षमता असताना ११५ प्रवासी बसविले होते. परिवहन विभागाकडून तपासणी केली असता प्रकार लक्षात आल्‍याने कारवाई करण्यात आली. 
मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण (वय -४० नेमणूक उप.प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार) यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, परिवहन आयुक्त महाराष्ट्र मुंबई यांचे १ व २ एप्रिल भ्रमणध्वनी निर्देशानुसार तसेच, सहायक मोटर वाहन निरीक्षक अविनाश तेलोरे (परिक्षाविधीन) व चालक किशोर मोघे यांचे पथक तयार करुन राष्ट्रीय महामार्ग तीन धुळे जिल्हा हद्द येथील तैनात केले होते. 

पहाटे बसची तपासणी
रविवारी पहाटे शासकिय वाहनाने पेट्रोलींग करताना रात्री तीन वाजून २० मिनिटांनच्या सुमारास बाभळेफाटा येथे मंबई कडून- बेहराई उत्तर प्रदेशकडे जाणारी लक्झरी बस (आर जे. २१, पी ए.४५४५) थांबवुन बसची तपासणी केली असता बसमध्ये एकुण ११५ प्रवाशी असे मिळून आले. वाहनाची शयन क्षमता ३० प्रवाशी वाहतुकीची असताना क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी असुरक्षितपणे धोकादायकरित्या प्रवाशी वाहतूक करताना तसेच साथीचा आजार कोव्हिड -१९ संदर्भात धुळे जिल्हा दंडाधिकारी यांचे आदेश पारीत असतानाही आदेशाचे उल्लंघन करुन दाटिवाटीने प्रवाशांना एकत्रित बसवून वाहतूक करताना मिळून आला. यामुळे लक्झरी चालक धिरेंद्र पाल (रा. ७१० जव्हारनगर उज्जेन, मध्यप्रदेश) व मालक शहाना इस्तेशाहाम अहेमद (रा. जोहरा, रतलाम चित्तोडगड, राजस्थान) यांच्याविरोधात शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

संपादन- राजेश सोनवणे

loading image