राष्‍ट्रवादीच्या अनिल गोटेंविरूद्ध गुन्हा; पोलिस प्रशासनाबाबत अपशब्‍द

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 February 2021

रविवारी सायंकाळी सातनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची जाहीर सभा झाली. दहशतवादमुक्त शिंदखेडा अभियानांतर्गत झालेल्या या सभेत पोलीस दलाची प्रतिमा व अब्रू मलिन केल्या प्रकरणी

चिमठाणे (धुळे) : दहशतवादमुक्‍त शिंदखेडा अभियानातंर्गत रविवारी झालेल्‍या सभेत राष्‍ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी पोलिस प्रशासनाविरूद्ध अपशब्‍द वापरल्‍या प्रकरणी चिमठाणे पोलिस दूरक्षेत्राचे कर्मचारी दीपक भिल यांनी शिंदखेडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अनिल गोटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी सायंकाळी सातनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांची जाहीर सभा झाली. दहशतवादमुक्त शिंदखेडा अभियानांतर्गत झालेल्या या सभेत पोलीस दलाची प्रतिमा व अब्रू मलिन केल्या प्रकरणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदखेडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमठाणा येथे दहशत मुक्त शिंदखेडा अभियानाअंतर्गत आयोजित सभे दरम्यान अनिल गोटे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. 

गोटेंचे यापुर्वीही वादग्रस्‍त विधान
राष्‍ट्रवादीचे ज्‍येष्‍ठ नेते असलेले अनिल गोटे यांनी यापुर्वी देखील जाहीर सभांमध्ये वादग्रस्त विधान केलेले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या वादग्रस्त विधानांची मोठी चर्चा असते. भाजपमध्ये असताना देखील अनिल गोटे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. त्‍यावेळी फडणवीस यांच्याबाबत केलेले वक्‍तव्य देखील बरेच चर्चेत राहिले होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news ncp anil gote in fir shindkheda police