
आप्पासाहेब प्लॉट मैदानावर सकाळी दहाला ही सभा होणार असून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
दोंडाईचा (धुळे) : २६ जानेवारीपासून ‘शिंदखेडा मतदान संघ भयमुक्त मतदार संघ’ यांची एक रॅली सुरू केली आहे. आता लोकांना परिवर्तन हवे आहे. आमदार रावलांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. दहशतवाद मुक्त अभियानाचा समारोप बुधवारी (ता १७) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या जाहीर सभेने होणार आहे. आप्पासाहेब प्लॉट मैदानावर सकाळी दहाला ही सभा होणार असून हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष डॉ. रवींद्र देशमुख, गुलाबसिंग सोनवणे, अमित पाटील, माजी सभापती नाजीम शेख, माजी नगरसेवक गिरीधारीलाल रामरारख्या, रवींद्र पाटील, राहुल चव्हाण, अस्लम शाह, अॅड. रवींद्र मोरे, प्रशांत पाटील, अभय पाटील, अबिद शेख आदी उपस्थित होते.
गोटे म्हणाले, की माजी मंत्री डॉ. हेमतराव देशमुख यांच्या सोबत अन्याय झाला. सत्तेचा दुरुपयोग करून घरकुल घोटाळा, आदी प्रकरणी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी आदेश दिले. डॉ. देशमुख, गिरधारीला रामराख्या, अॅड. एकनाथ भावसार यांच्या विरुद्ध केलेले आरोप खोटे आणि कुठल्याही भ्रष्टाचार झालेला नाही. दोंडाईचा नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ दीपक सांवत यांनी तपासी अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांना कळविले आहे. तरीही तत्कालीन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. देशमुख हे दोन वेळा आमदार व एक वेळा मंत्री राहिलेले ज्येष्ठ राजकारणीवरती असे खोटे गुन्हे दाखल करून छळ केले जात असतील, तर गावोगावी राहणारे सामान्य नागरिकांचे काय हाल असणार यांची कल्पना न केलेली बरी. हा दहशत संपून टाकण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. ती १७ तारखेला पूर्ण होईल तरी सभेला प्रचंड संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. गोटे यांनी केले आहे.