राष्ट्रवादीच्या मेळाव्यात गोटे-शिंदे समर्थकांत जुंपली; गोंधळाचे फोटो डिलीट करण्याची मंत्र्यांची गळ 

निखील सुर्यवंशी
Wednesday, 10 February 2021

ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांची मदत लाभली नाही, असा आरोप केला. हा आरोप करताच त्याच्या दिशेने शिंदे समर्थक धावून आला.

धुळे : येथील केशरानंद गार्डनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण शाखेचा रात्री आठनंतर मेळावा झाला. त्या वेळी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे आणि जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीसह गोंधळ उडाला. ही स्थिती दौऱ्यावर असलेले मार्गदर्शक जलसंपदामंत्री तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते एकनाथ खडसे यांना हताशपणे पाहावी लागली. 
राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या ग्रामीण शाखेच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेताना गोटे समर्थक कार्यकर्त्याने ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षातील ग्रामीण पदाधिकाऱ्यांची मदत लाभली नाही, असा आरोप केला. हा आरोप करताच त्याच्या दिशेने शिंदे समर्थक धावून आला. त्यानंतर गोटे- शिंदे समर्थक आमनेसामने आले आणि त्यांच्यात शाब्दिक चकमकीसह गोंधळ उडाला. 

मंत्र्यांचा हस्‍तक्षेप अन्‌ फोटो डिलीटची गळ
दहा मिनिटांनंतर गोंधळाचे वातावरण शमले. त्यात मंत्री पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला. मेळाव्यातील कार्यकर्त्यांनी ही माहिती दिली. मंत्री पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांना गोंधळाचे फोटो डिलीट करण्याची गळ घातली. काही वेळाने मेळावा सुरळीत सुरू झाला. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news ncps melava jayant patil eknath khadse anil gote