esakal | एसटीचा पॅकेज टूर..दोन दिवस फिरा शनिशिंगणापूर, वेरूळलेणी अन्‌ भद्रामारोती
sakal

बोलून बातमी शोधा

parivahan bus

राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या बसचेही चाक रूतले होते. हे रुतलेले चाक हळूहळू रुळावर येत असून आंतरराज्यची वाहतूक सुरू झाल्यानंतर आता शासनाने पर्यटन स्थळांना खुले केले आहे. म्हणूनच धुळे विभागातर्फे पर्यटन स्थळांसाठी शनिवार, रविवार विशेष बस सेवा सूरू करण्यात आली आहे.

एसटीचा पॅकेज टूर..दोन दिवस फिरा शनिशिंगणापूर, वेरूळलेणी अन्‌ भद्रामारोती

sakal_logo
By
प्रा. डॉ. दीपक बाविस्कर

धुळे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे 'पॅकेज टूर योजना’ सुरू केली आहे. त्‍यानुसार धुळे विभागातर्फे प्रवाशांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी शनिवार, रविवार पॅकेज टूर योजनेला सुरवात करण्यात आली. 

धुळे विभागाचे विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ, वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले यांचे नेतृत्वात सुरुवात होईल. जेष्ट नागरीक व बालक यांना सवलतीच्या दरातच प्रवास करता येणार असल्‍याचे पत्रकान्वये विभाग नियंत्रक मनिषा सपकाळ यांनी कळविले आहे.
कोरोना काळात पाच- सहा महिने सारेच व्यवसाय बंद होते. त्यातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या बसचेही चाक रूतले होते. हे रुतलेले चाक हळूहळू रुळावर येत असून आंतरराज्यची वाहतूक सुरू झाल्यानंतर आता शासनाने पर्यटन स्थळांना खुले केले आहे. म्हणूनच धुळे विभागातर्फे पर्यटन स्थळांसाठी शनिवार, रविवार विशेष बस सेवा सूरू करण्यात आली आहे. यात साधी परिवर्तन बस प्रवाशींच्या सेवेला असेल. 

ऑनलाईन आरक्षणाची सुविधा
पॅकेट टूरच्या सर्व बस या धुळे येथून सूटणार असून पॅकेज टूर योजनेच्या प्रवासासाठी ऑनलाईन आरक्षणाची सूविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व बसच्या परतीचा वेळाही निश्चित करण्यात आल्या आहे. तसेच शिरपूर येथून एक बस धुळे, नांदुरीगड, दिंडोरी, त्रंबकेश्वर अशीही सूटणार आहे. या पॅकेज टूर योजनेचा लाभ प्रवाशांनी करून घ्यावा असे आवाहन श्रीमती सपकाळ. विभाग वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले, राजेंद्र भावसार यांनी केले आहे.

पर्यटन स्थळांना भेटीची संधी (कंसात बसची वेळ व वार)
- शेगाव दर्शन (सकाळी 6.30 वा. परत 21.30 वाजता, प्रत्येक रविवारी) प्रवासभाडे प्रौढ नागरीक 640 रु, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले 320 रु. 
- घृष्णेश्वर, वेरूळलेणी, भद्रामारूती, दौलताबाद दर्शन (सकाळी 6.00 वा. परत 21.00 वाजता प्रत्येक शनिवार, रविवारी) प्रवासभाडेः प्रौढ नागरीक 360 रु, ज्येष्ठ नागरिक व लहान मुले 180 रु.
- औरंगाबाद, देवगड, नेवासा, शनीशिंगणापूर, पैठण, जायकवाडी दर्शन (सकाळी 6.00 वा. परत 21.00 वाजता, प्रत्येक शनिवार, रविवार) प्रवासभाडे प्रौढ नागरीक 715 रु , ज्येष्ठ नागरिक व लहान मुले 360 रु. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image