अडीच हजार पथविक्रेत्यांना कर्ज मंजूर; पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना 

रमाकांत घोडराज
Tuesday, 26 January 2021

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे पथविक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले यांना जे नुकसान झाले आहे. ते भरून निघण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी बँकेमार्फत प्रत्येकी दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे, अशी ही योजना आहे.

धुळे : केंद्रपुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेंतर्गत अडीच हजार पथविक्रेत्यांना बॅंकेमार्फत कर्ज मंजूर झाले असून आतापर्यंत एक हजार पथविक्रेत्यांना कर्ज वाटप झाले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना लवकरच बँकांमार्फत कर्ज वितरित होईल, अशी माहिती महापालिकेने दिली. 

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे पथविक्रेते, फेरीवाले, ठेलेवाले यांना जे नुकसान झाले आहे. ते भरून निघण्यासाठी त्यांना भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी बँकेमार्फत प्रत्येकी दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देणे, अशी ही योजना आहे. कर्जवाटपासाठी आयुक्त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली बँकांची बैठकही झाली. त्यांच्यासह योजनेचे नोडल अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, योजनेच्या साहाय्यक आयुक्त पल्लवी शिरसाट यांच्या नियंत्रणात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे महापालिकेतील व्यवस्थापक गणेश खोंडे व दीपक खोंडे, समुहसंघटक सुनील सरदार, धम्मदीप सावंत, छाया पाटील, सुनीता निकम योजनेच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news pm atmanirbhar yojana hockers loan in proacces