
शासनाने या रेशनदुकानदारांना धान्य वाटपाचा मेहनताना (कमिशन) हा शिंदखेडा तालुक्याला दुसरा हप्ता ६० लाख ४२१ रूपये दोन महिन्यापासून तहसीलदार कार्यालयात येऊन पडले आहेत.
चिमठाणे (धुळे) : कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले, नोकरी गेली, सर्वसामान्यांची रोजंदारी बुडाली, जगावे कसे असा प्रश्न असतानाच शासनाने रेशन दुकानातून मोफत धान्य पुरवठा करून त्यांना जगवण्याचा प्रयत्न केला. शासनाने या रेशनदुकानदारांना धान्य वाटपाचा मेहनताना (कमिशन) हा शिंदखेडा तालुक्याला दुसरा हप्ता ६० लाख ४२१ रूपये दोन महिन्यापासून तहसीलदार कार्यालयात येऊन पडले आहेत. मात्र टक्केवारी मुळे ‘घोडे’ आडले आहे.
कोरोना काळात शासनाने रेशनदुकानातून मोफत तांदूळ व गहू हे धान्य पुरवठा करून त्यांना जगवण्याचा प्रयत्न केला. शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वाटपाचा मेहनताना (कमिशन) एप्रिल , मे व जून २०२० या कालावधीत पहिला हप्ता ४६ लाख २७ हजार ६८० रुपये १८० दुकानदारांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
रेशन पुरवठा प्रणाली वादग्रस्तच
स्वत धान्य दुकानदारांचा जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर २०२० या महिन्याचा दुसरा हप्ता ६० लाख ४२१ रुपये एवढी रक्कम शिंदखेडा तहसील कार्यालयात दोन महिन्यांपासून येवून रक्कम पडली आणि पुरवठा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी पोटात दुखू लागले. मिशनमधून कमिशन गोळा केले जात असून त्याचे अधिकाऱ्यांच्या दर्जानुसार वाटप केले जाणार आहे. यातून अधिकाऱ्यांना कमिशन का द्यावे, असा प्रश्न उपस्थित होत असताना रेशन दुकानदार आणि अधिकारीही धुतल्या ‘तांदूळाचे’ नसल्याचे यातून सिद्ध होत आहे. रेशन पुरवठा प्रणाली आधिपासूनच वादग्रस्त ठरली आहे. शासनाचा हेतू चांगला असला तरी यंत्रणेतील भ्रष्ट्राचाराचा सूर ही यंत्रणा आधिपासूनच कुरतड आहेत.
संपादन ः राजेश सोनवणे