साक्री तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण पहा एका क्‍लिकवर

धनंजय सोनवणे
Thursday, 28 January 2021

तहसील कार्यालयातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात ही सोडत प्रक्रिया पार पडली. उर्वरित पेसा क्षेत्रातील १०१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत व महिला आरक्षणाची सोडत येत्या १ फेब्रुवारीला प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 

साक्री (धुळे) : तालुक्यातील १६९ पैकी ६८ ग्रामपंचायतीच्या २०२०-२०२५ या पाच वर्षांच्या कालावधीतील सरपंचपदासाठी गुरूवारी (ता. २८) आरक्षण सोडत काढण्यात आली. यात नुकत्याच निवडणूक झालेल्या व पुढील काळात मुदत संपणाऱ्या अशा पेसा क्षेत्र वगळून ६८ ग्रामपंचायतीसाठी सरपंच आरक्षण सोडत काढण्यात आली.

तहसील कार्यालयातील छत्रपती शाहू महाराज सभागृहात ही सोडत प्रक्रिया पार पडली. उर्वरित पेसा क्षेत्रातील १०१ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत व महिला आरक्षणाची सोडत येत्या १ फेब्रुवारीला प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. 
तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांच्या अध्यक्षतेखाली आजची सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली, यावेळी निवासी नायब तहसीलदार डॉ. अंगद असटकर, गोपाळ पाटील, परिवीक्षाधीन नायब तहसीलदार ललिता साबळे, जयवंत पाटील आदींसह अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, पदाधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यात ६८ पैकी अनुसूचित जाती या संवर्गासाठी चार, अनुसूचित जमाती संवर्गासाठी १२, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १८ तर सर्वसाधारण संवर्गासाठी ३४ ठिकाणी सरपंचपद आरक्षित झाले. नागरिकांचा मागास प्रवर्ग या संवर्गातील ९ गाव निश्चित झाल्यानंतर उर्वरित १२ पैकी ९ गाव निवडण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यासाठी श्लोक पाटील या लहान मुलाने चिठ्ठ्या काढल्या. 

ग्रामपंचायत निहाय सरपंच आरक्षण 
अनुसूचित जाती : विटाई, लोणखेडी, कळंभीर, छाईल. 
अनुसूचित जमाती : जामदे, अष्टाणे, शेवाळी (मा), कावठे, धाडणे, तामसवाडी, कोकले, मालपुर, आयने (मळखेडे), दातर्ती, दुसाने, छावडी (अमोदे). 
नागरिकांचे मागास प्रवर्ग : भाडणे, उभंड, चिंचखेडे, आखाडे, भागापूर, दिघावे, खोरी, म्हसाळे, फोफादे, ककानी, शेवाळी (दा), म्हसदी प्र.नेर, प्रतापपूर, खुडाने, वसमार, धमनार, महिर, कढरे. 
सर्वसाधारण : नांदवन, नवडणे, वाजदरे, काळगाव, गणेशपुर, छडवेल (प), उंभरे, उभंरांडी, हट्टी (बु), मलांजन, निळगव्हाण, नागपूर (व), नाडसे, शेणपूर, अक्कलपाडा, बळसाने, ऐचाळे, इंदवे, सतमाने, दारखेल, उंभर्टी, भामेर, वेहेरगाव, हट्टी (खू), सय्यदनगर, निजामपूर, जैताने, सातारपाडा, वर्धाने, फोफरे, अंबापुर, भडगाव (व), कासारे, बेहेड. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi dhule news sakri taluka gram panchayat sarpanch reservation