esakal | साडेतीन वर्षे हिंदुत्वावरच जोर देणार : संजय राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

साडेतीन वर्षे हिंदुत्वावरच जोर देणार : संजय राऊत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

धुळे : राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील (Maha vikas aaghadi) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलो तरी शिवसेनेने हिंदुत्वाचा त्याग केलेला नाही. त्यामुळे सत्तेच्या उर्वरित साडेतीन वर्षांत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच जोर देणार आहोत. शिवसेनेचा (Shiv sena) सेक्युलर चेहरा होणार नाही, याची काळजी घेऊ, असे खासदार संजय राऊत (MP Sanjay raut) यांनी धुळे येथे दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत सांगितले. (dhule-sanjay-raut-tour-in-district-meet-dhule-shiv-sena)

हेही वाचा: उद्धव ठाकरे सरकारचे मॉडेल प्रशंसनीय !

ते म्हणाले, की भाजपशी शिवसेनेचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. आता राज्यात भाजप विरोधी पक्षात आहे इतकेच. विरोधी पक्षाशी सरकारची मैत्री असते. ती असली तर राज्याचा कारभार चांगला चालतो. तसेच संघर्षरत राहणे हा शिवसेनेचा स्थायीभावच आहे. संघर्ष विरोधात असतानाच करावा असेही नाही, तर विकासकामांसाठी आणि जनतेसाठी संघर्ष करावा लागतो. विकासकामांसाठी पालकमंत्र्यांना जाणीव करून देतो तो शिवसैनिक असतो. लवकरच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांना भेटून धुळे शहर आणि जिल्ह्यासाठी निधी मिळवून देईन. आपण पक्ष म्हणून निधी आणून विकासकामे करून जनाधार मिळवू, असा विचार करणे महत्त्वाचे आहे.

बाळासाहेबांच्‍या विचारांमुळे अनेक आमदार, खासदार

शिवसेनेत प्रत्येक जण शिवसैनिक आहे. पद आज आहे उद्या नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन सर्वांनी काम करावे. राज्यात १२ ते १३ जिल्ह्यांत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी नाही, हे शल्य आहे. पण त्याचा जास्त विचार नको. मुंबईत २५ वर्षे संघर्ष केला. कुणाच्या मनात नव्हते की शिवसेनेचा आमदार असेल. पण, बाळासाहेबांच्या विचारांमुळे शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार झाले. मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष शिवसेनेने दिला. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत. कोरोनात दीड वर्ष गेले. आज माणसे जगविणे महत्त्वाचेच आहे. त्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. मराठा समाज, ओसीबींसाठी मोठी कायदेशीर लढाई सरकार लढत आहे. त्यात कुठेही कमी पडलेलो नाही, असे श्री. राऊत विविध प्रश्‍नांवर म्हणाले.