esakal | उद्धव ठाकरे सरकारचे मॉडेल प्रशंसनीय !
sakal

बोलून बातमी शोधा

MP Sanjay Raut

उद्धव ठाकरे सरकारचे मॉडेल प्रशंसनीय !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः
कोरोनाच्या (corona) संकटकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी कुशलतेने स्थिती हाताळली. या महामारीवर नियंत्रण मिळविले. जनतेला दिलासा दिला. त्यांच्या या कार्यशैलीमुळे राज्याच्यातील विशेष मॉडेलचा जागतिक पातळीवर गौरव झाला आहे. असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी ठाकरे सरकारच्या कामाची स्तृती केली. (uddhav thackeray government corona period work is good)

हेही वाचा: तब्बल..११३ दिवसानंतर जळगावची कोरोना रुग्ण संख्या शंभरीच्या आत !

पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल

श्री. राऊत म्हणाले, की शिवसेनेची जिल्ह्यातील ताकद वाढली पाहिजे. पक्ष वाढीसाठी सर्वोतोपरी मदतीसाठी तयार आहे. पाच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार टिकेल. त्यामुळे चिंता करू नये. सत्तेच्या उर्वरित साडेतीन वर्षांच्या कालावधीत स्थानिक पातळीवरील मागणीनुसार विकास कामे मार्गी लावण्यासाठी सोबत असेल. कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत केला, तर सरकार आणि शिवसेनेला बळ मिळेल.

हेही वाचा: नंदुरबार जिल्ह्यात रासायनिक खतांचा २३ हजार मेट्रिक टन पुरवठा

भगवा फडकविण्याचा विडा उचला

जनतेला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा द्यावा. महापालिका क्षेत्र, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांचे प्रश्‍न सोडवावेत. शहर विकासाबाबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटावे. आजी- माजी पदाधिकाऱ्यांनी समन्वयातून पक्ष संघटनाच्या कार्यात वाहून घ्यावे. यापुढे सर्व निवडणुकांमध्ये पक्षाचा भगवा फडकविण्याचा विडा उचलावा, असेही श्री. राऊत म्हणाले. श्री. थोरात यांनी संघटनात्मक बांधणीवर मनोगत व्यक्त केले. श्री. माळी यांनी प्रास्ताविक करत जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. डॉ. तुळशीराम गावित यांनी आभार मानले.