esakal | पोलिसांना पाहून पळ काढला; कारची तपासणीत सापडला अवैध साठा
sakal

बोलून बातमी शोधा

wine

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची पाहणी करीत असतांना सहायक निरीक्षक सचिन साळुंखे यांना मद्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांना पाहून पळ काढला; कारची तपासणीत सापडला अवैध साठा

sakal_logo
By
सचिन पाटील

शिरपूर (धुळे) : मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर एका कारमधून सव्वातीन लाख रुपये किंमतीचा मद्यसाठा थाळनेर पोलिसांनी गुरूवारी रात्री जप्त केला. घटनास्थळावरून एकाला अटक करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्ताची पाहणी करीत असतांना सहायक निरीक्षक सचिन साळुंखे यांना मद्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यांनी महामार्गालगत पिंप्री (ता. शिरपूर) येथे सापळा रचला. वाहनांची तपासणी करतांना त्यांनी रात्री दहाला संशयावरून कार (जीजे 05 सीएफ 4470) ला थांबवले. पोलिसांना पाहून कारमधील दोघांनी पळ काढला. 

पाठलाग करत पकडले
पोलिसांनी पाठलाग करून संशयित अकबर शाह अय्युब शाह (वय 35, रा.मोगलाई, धुळे) याला पकडले. दुसरा संशयित मात्र अंधारात फरार झाला. कारच्या तपासणीत बॉम्बे व्हिस्की या ब्रँडचे मद्य भरलेली 50 खोकी जप्त करण्यात आली. कारसह या मुद्देमालाची एकूण किंमत चार लाख 62 हजार रुपये आहे. पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर अधीक्षक धुळे प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन साळुंखे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार सिराज खाटीक, उन्मेष आळंदे, नरेंद्र पवार, प्रकाश मालचे, विजय जाधव यांनी ही कारवाई केली.  

संपादन ः राजेश सोनवणे