esakal | बाहुबली कलिंगड बांगलादेश नेपाळात; शिक्षक शेतीतील बाहुबली

बोलून बातमी शोधा

watermelon
बाहुबली कलिंगड बांगलादेश नेपाळात; शिक्षक शेतीतील बाहुबली
sakal_logo
By
भरत बागुल

पिंपळनेर (धुळे) : येथील एका खाजगी आश्रमशाळेतील शिक्षकाने शिक्षकी पेशा सांभाळून बटाई घेतलेल्या १३ एकर शेतीत कलिंगडाची लागवड करून विक्रमी उत्पादन घेत शेतीची प्रयोगशीलता जोपासत तालुक्यात चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरला आहे. मनीष माळी या शिक्षक शेतकऱ्याने ३५० टनापेक्षा अधिक उत्पादित केलेले टरबूज (कलिंगड) नेपाळ, पश्चिम बंगाल व कोलकत्ता येथील बाजारपेठेत मागणी वाढली आहे.

सिर्मेन्स सीड्स कंपनीचे सर्वोत्तम शक्तिशाली बाहुबली टरबूज या वाणाची निवड करून दोन किलो ते सात- आठ किलोग्रॅम वजनाच्या साईजचे कलिंगड उत्पादन केल्याने या मास्तर शेतकऱ्याची प्रयोगशील शेती पाहण्यासाठी अनेक विविध कंपनीचे अधिकारी व प्रगतिशील शेतकऱ्यांनी माहिती घेण्यास संपर्क साधत आहे.

वीस एकर शेती एकाच ठिकाणी असल्याने त्‍यातील तेरा एकर येथीत कलिंगड पीक लागवड केले. कलिंगडाच्या अनेक संकरित जाती व वाण आहेत. यात बाहुबली टरबूज वाणाची निवड करून लागवड केली. एकेरी याचे उत्पादन ३० ते ३५ टन इतके काढल्यामुळे शेतीत नवी आर्थिक गणित बसवले. पारंपरिक शेती शहादा तालुक्यात जयनगर येथे आहे.

शिक्षक अन्‌ शेतीत कमाल

पिंपळनेर येथे खाजगी आश्रमशाळेत मुख्याध्यापक म्हणून सेवेत असताना मुख्याध्यापक पद सोडून शिक्षक म्हणून सेवेत आहेत. शेतीची प्रचंड आवड व शेतीची प्रयोगशीलता अंगी असल्याने फावल्या वेळेत शेती करण्याची आवड स्वस्थ बसू देईना. म्हणून पिंपळनेर लगतच्या गावात पंच्चावन्न एकर जमीन बटाईने अर्थातच भाडेपट्ट्यावर घेतली. जेबापूर शिवारात तेरा एकर शेतीत पपईचे आंतरपीक म्हणून वेलवर्गीय कलिंगड लागवड केली.

एकूण ५० हजाराचा खर्च

कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारे हे पीक असल्याने संकरित वाणनिवड, रोप निर्मिती, मल्चिंग पेपरचा वापर आधुनिक एकात्मिक व्यवस्थापन असे नियोजनबद्ध अवलंब केला. एकरी ३०-३५ टन व ५० हजार खर्च झाला. शिवाय एकात्मिक खत व्यवस्थापन दिवसाआड केले आहे. तेरा एकरातील लागवडीचा पक्का कलिंगड माल बेटावदच्या व्यापाऱ्यामार्फत नेपाळ, पश्‍चिम बंगाल परदेशात व कलकत्ता आदी मोठ्या शहरातील बाजारपेठेत विक्री केला आहे. सर्व साधारण डिसेंबर ते जानेवारी दरम्यान बाजारात लागवड करून मार्च एप्रिल महिन्यात काढला. आता पुन्हा आंतरपीक म्हणून पपई पिकाचे उत्पन्न काही दिवसात निघायला येईल. अलीकडे उत्तम व रवेदार साखरगोडीचे हे बाहुबली वाणाचे कलिंगड अल्पावधीतच लोकप्रिय झालीत. सध्या तेरा एकरक्षेत्रात हार्वेस्टींग (मशागत) सुरू असून एक मेस पुन्हा दहा एकरात बाहुबली लागवडीचे नियोजन केलेले आहे. यामुळे या शिक्षक शेतकऱ्याचे आर्थिक गणित सुटले आहे.

आंतर पीकात पपईचे उत्‍पादन

शेतीमध्ये केलेल्या कामातून व कष्टातून मला शैक्षणिक कामासाठी प्रोत्साहन व बळ तर मिळतेच पण या भागातील शेतक-यासाठी एक प्रगतीची सकाळ म्हणून उदाहरण ठरेल. सध्या मनिष माळी व त्यांचा सहकारी यांनी या परिसरात एकूण ५५ एकर शेत जमीन बटाईवर घेतली असून पैकी १३ एकर शेती टरबूज व आंतरपिक पपई टरबूज उत्पन्न घेतले. ३ एप्रिल ते १० एप्रिल दरम्यान हार्वेस्टिंग केले. परत ५ एकर टरबूज व आंतरपिक केळी तसेच २ एकर खरबुज लागवड आंतरपिक केळी, परत ३ एकर टरबूज आंतरपिक पपई, २ एकर शेतीत खरबुज व आंतरपिक १० एकर केळी आहे. इतर शेतीची हार्वेस्टिंग चालु आहे. ५ एकर कांदे काढणी चालु आहे. ५ एकर टमाटे लागवडीचे नियोजन चालु आहे.१० मे ला १० एकर टरबूज व आंतरपिक मिरची रोप बुकिंग झाले आहे.यामुळे शिक्षक हा शेतक-यांचा शिक्षक ठरत असून नफ्याची शेतीमुळे आर्थिक गणित सुटले आहे.

संपादन- राजेश सोनवणे