esakal | पुष्पगुच्छ, मास्क देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत; पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

school open

कोरोना महामारीमुळे बंद असलेल्‍या शाळा आता सुरू होवू लागल्‍या आहेत. अनेक दिवसानंतर शाळांमध्ये येणाऱ्या विद्यार्‍थ्‍यांचे स्‍वागत त्‍यांचे शिक्षक करत आहे. पुष्‍पगूच्छ आणि कोरोनापासून रक्षण म्‍हणून मास्‍क देवून विद्यार्‍थ्‍यांचे स्‍वागत करत आहेत.

पुष्पगुच्छ, मास्क देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत; पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुरवात

sakal_logo
By
दीपक वाघ

बभळाज (धुळे) : साधारण गेल्या दहा महिन्यांपासून पूर्ण जगावर कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबींना मोठा फटका बसला होता. परंतु राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्णय घेत आजपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश काढले. त्‍यानुसार 27 जानेवारी शाळा सुरू आणि शाळेत आलेल्‍या विद्यार्‍थ्‍यांचे स्‍वागत करण्यात आले. 
शासनाच्या सर्व नियमांचे तंतोतंत पालन करून विद्यालयाचे पाचवी ते आठवी या वर्गाचे कामकाज आजपासून सुरू केले. काही विद्यालयांच्यावतीने विद्यार्थ्यांचे मास्क व गुलाब पुष्प देऊन स्‍वागत केले. हा उपक्रम बभळाज येथील माध्यमिक शाळांमध्ये पाहण्यास मिळाला. शाळेतील प्राचार्य आर. एन. पवार व शिक्षक बी. डी. पाटील, बी. एस. मोरे, आर. यू. पवार, एस. बी. तावडे, एम. एल. जाधव, आर. एम. मोरे यांनी मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. 

विद्यार्‍थ्‍यांचे प्रथम थर्मल स्‍कॅनिंग
शाळेत आलेल्‍या सर्व विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर फिजिकल डिस्टन्स यांचे तंतोतंत पालन करून विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात आला. तसेच फिजिकल डिस्टंसिंग, सॅनिटायझर यांचा वेळोवेळी वापर करा अशा सूचना विद्यालयातर्फे देण्यात आल्या. जर एखाद्या विद्यार्थ्यास सर्दी, खोकला, ताप या बाबी निदर्शनास आल्यावर त्याने त्याच्या पालकांना सांगून त्वरित डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे; अशा सूचना शाळेतील प्राचार्य पवार व शिक्षक बंधू यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image