esakal | रात्रीचा कट्टाही लागला रंगू..शेकोटीवर म्‍हणे ‘सासू’ आणं
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat election

थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दोन दिवसांपासून बारा अंशावर पारा आला आहे. गल्लीबोळांसह चौकाचौकांत शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शेकोटी भोवती राजकारणाच्या उबदार गप्पा रंगू लागल्या आहेत. या गप्पांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीपासून ते पश्चिम बंगालच्या निवडणूकीपर्यंतच्या गप्पा झोडल्या जात आहेत.

रात्रीचा कट्टाही लागला रंगू..शेकोटीवर म्‍हणे ‘सासू’ आणं

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे (धुळे) : ज्यास्ना पैसा धुम करतस. ज्या लोकेस्ले काममा येतस नही. ज्यास्नी पंचायतनी पायरीबी चढेल नही र्‍हास. इकासकामेसशी ज्यास्ना दूर लगून संबंध नही र्‍हास. त्याच निवडणूक लढावानी गर्दी करी र्‍हायनात. लोकेस्ना मदतले जाणारास्ले कोणी इचारसन नही. हौश्या नवश्यास्न राजकारण सुरु व्हई जायले से. गावना इकास्नी कुणलेच पडेल नही...आदी गप्पांचा फड सध्या शेकोटीभोवती रंगू लागला आहे.

पारा बारा अंशावर
जिल्ह्रातील दोनशे अठरा ग्रामपंचायतींच्या निवडणूकीसाठी ग्रामीण वातावरण ढवळून निघण्यास प्रारंभ झाला आहे. थंडीचा कडाका वाढू लागला आहे. दोन दिवसांपासून बारा अंशावर पारा आला आहे. गल्लीबोळांसह चौकाचौकांत शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शेकोटी भोवती राजकारणाच्या उबदार गप्पा रंगू लागल्या आहेत. या गप्पांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीपासून ते पश्चिम बंगालच्या निवडणूकीपर्यंतच्या गप्पा झोडल्या जात आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे.

एकाच भाऊबंदकीतील इच्छुक वाढले
२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. प्रत्येक प्रभागातील इच्छुक भाऊबंदकीसह जातीपातीच्या बैठका घेत आहेत. स्वतः उमेदवार म्हणून किती लायक आहोत, हे ठासून मांडत आहेत. पण ऐन वेळेस इतरही इच्छुकांनी भूमिका मांडण्यासही संधी मिळाल्याने वादाविवाद वाढत आहेत. आपल्याच भाऊबंदकीतील कसे निवडून येतील. यासाठी काही रणनिती आखण्यामध्ये गुंतले आहेत.

आते सासू लयनीच पडी
शेकोटी भोवती गप्पा मारतांना शेकोटी बराच वेळ धगधगत ठेवावी लागते. त्यासाठी काड्या, लाकडं, पालापाचोळ्याची गरज असते. ती आणण्यासाठीही कसरत सुरु असते. जो आणतो त्याला खानदेशी बोलीभाषेत 'सासू आण‍न्ही’ असे उपरोधिक म्हटले जाते. ती सासू जो आणेल त्यालाच शेकोटीभोवती बसू दिले जात आहे.

उद्यापासून उमेदवारी दाखल कार्यक्रम
23 डिसेंबर : उमेदवारी दाखल करण्यास प्रारंभ 
30 डिसेंबर : अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस
31डिसेंबर : अर्जांची छाननी
4 जानेवारी : माघार व चिन्ह वाटप
15 जानेवारी : मतदान
18 जानेवारी : मतमोजणी व निकाल

संपादन ः राजेश सोनवणे

loading image