ग्रामसेवकाचा प्रताप..सॅनिटायझरसाठी २४ लाखांचा खर्च; ई-निविदेच्या खोट्या पत्राची नोंद 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 February 2021

२०१६ त २०२० या कालावधी अक्कलकुवा ग्रामपंचायतीत चार कोटी ७५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला होता. प्रशासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारींवरून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी चार सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करत कारवाई केली होती.

अक्कलकुवा (नंदुरबार) : बहुचर्चित प्रकरणाचा निकाल प्रशासनाकडून लावल्याची माहिती देण्यात आली आहे. साधारण चार कोटी ७५ लाखांच्या गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या समितीने अहवाल देऊनही दोषी म्हणून केवळ सहा जणांवर थातूरमातूर कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. कोरोना काळात सॅनिटायझर खरेदीसाठी २४ लाखांचा खर्च दर्शविला गेला आहे. यासाठी ई-निविदा काढल्याचे खोटे पत्र आणि जाहिरात संबंधित ग्रामसेवकाने तयार करून दप्तरात नोंद आहे. 
२०१६ त २०२० या कालावधी अक्कलकुवा ग्रामपंचायतीत चार कोटी ७५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला होता. प्रशासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारींवरून तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी चार सदस्यांची चौकशी समिती नियुक्त करत कारवाई केली होती. समितीने ग्रामपंचायतीत गैरव्यवहार झाल्याचा अहवाल नोव्हेंबर २०२० मध्ये जिल्हा परिषदेकडे दिला होता. परंतु अहवालात त्रुटी असल्याचे, तसेच जबाब देणारे माजी सरपंच अमरसिंग वळवी, माजी सरपंच उषाबाई बोरा, विद्यमान सरपंच राजेश्वरी वळवी, प्रशासक जे. एस. बोराळे, आर. एम. देव, ग्रामविकास अधिकारी व्ही. बी. जाधव, आनंदा पाडवी आणि ग्रामसेवक एस. आर. कोळी यांनी दिलेले खुलासे अपूर्ण असल्याचे सांगून सर्व नऊ जणांची १० ते १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषदेत चौकशी सुरू होती. 

चौकशी अहवालातही चुकीची माहिती
चौकशीचा अहवाल जिल्हा परिषदेने २२ फेब्रुवारीला दिला आहे. यात चार कोटी ७५ लाखांऐवजी तीन कोटी १७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या अहवालात सर्व जणांच्या कार्यकाळात गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता दिसून येत असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे कोरोना काळात खरेदी करण्यात आलेल्या सॅनिटायझरसाठी २४ लाखांचा खर्च दर्शविला गेला आहे. यासाठी ई-निविदा काढल्याचे खोटे पत्र आणि जाहिरात संबंधित ग्रामसेवकाने तयार करून दप्तरात नोंद केल्याचे समोर आल्यानंतर केवळ शिस्तभंगाच्या कारवाईच्या नोटिसा काढण्यात आल्याचे समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news akkalkuwa gramsevak corona sanitizer fraud