esakal | मका, तुरीच्या पिकात अफूची झाडे; अक्राळे शिवारात दहा लाखांची झाडे जप्त 

बोलून बातमी शोधा

ganja tree}

अक्राळे गाव शिवारात अफूची शेती असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना मिळाली होती. त्यांनी या बातमीची खात्री करण्यास सहकार्यांना सांगितले.

मका, तुरीच्या पिकात अफूची झाडे; अक्राळे शिवारात दहा लाखांची झाडे जप्त 
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : मका व तुरीचा पिकात अफूची शेती अक्राळे शिवारात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी केलेल्या कारवाईत आढळून आली आहे. दहा लाखांची झाडे जप्त करीत पोलिसांनी दोन उत्पादकांविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या परिसरात आणखी अशी उत्पादन घेणारी उत्पादक असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने शोध सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 
अक्राळे गाव शिवारात अफूची शेती असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत यांना मिळाली होती. त्यांनी या बातमीची खात्री करण्यास सहकार्यांना सांगितले. खात्री नंतर शनिवारी (ता.२७) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद पाटील, हवालदार रवींद्र पाडवी, ज्ञानेश्वर सामुद्रे , ज्ञानेश्वर पाटील, पोलिस नाइक राकेश वसावे, जितेंद्र तोरवणे यांच्या पथकाने सांयकाळी सहा वाजता अक्राळे गाव शिवारात ज्ञानेश्‍वर जगन धनगर यांच्या मक्याच्या शेतात छापा टाकला. 

पिकांमध्ये अफूची झाडे
छाप्यात मक्यासोबतच अफूची बेकायदेशीररित्या लागवड केली असल्याचे दिसून आले. तसेच बाजुलाच असलेल्या कृष्णा गोबा धनगर याच्या शेतात देखील अफूची लागवड केली असल्याचे अढळून आले. पथकाने दोन्ही शेत पिंजल्यानंतर तेथे लागवड केलेली ३ ते ५ फुट उंचीची परिपक्व झालेली व बोंडे आलेली अफूची एकूण ५०५ किलो वजनाची १० लाख १५ हजारहून अधिक किंमतीची झाडे उपटुन जप्त केली. शेत मालक ज्ञानेश्वर जगन धनगर व कृष्णा गोबा धनगर (दोन्ही राहणार रजाळे ता. नंदुरबार) यांच्यावर विरूद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. उत्पादक ज्ञानेश्वर धनगर यास अटक करण्यात आली असून कृष्णा धनगर हे फरार झाले. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे