भुईमूग काढणी..वातावरणातील बदलाने उत्‍पन्नात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

groundnut

भुईमूग काढणी..वातावरणातील बदलाने उत्‍पन्नात घट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वडाळी (नंदुरबार) : भुईमूग काढणीच्या (Groundnut) कामात शेतकरी (Farmer) शेतशिवारात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. खरिपाची तयारीदेखील सुरू झाली आहे. ग्रामीण भागात मजुरांना त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाली आहे. (Farmers engaged in summer groundnut harvesting)

वडाळीसह परिसरात सध्या रब्बी हंगामातील उन्हाळी भुईमूग शेंगा काढणीच्या कामाला सुरवात झाली असून, खरिपाची लगबग सुरू आहे. या वर्षी परिसरात मोठ्या प्रमाणात बागायतदार शेतकऱ्यांनी भुईमूग पिकांची पेरणी केली आहे. मजुरांच्या सहाय्याने भुईमूग शेंगांची काढणी केली जात असून, वडाळीसह परिसरात या वर्षी विहिरी व‌ कूपनलिकांची भूजल पातळी चांगली असल्याने रब्बी हंगामातील भुईमूग पिकांचे क्षेत्रफळही वाढले आहे. परिसरात सध्या भुईमूग शेंगा काढणीचे काम करताना मजूरवर्ग मोठ्या प्रमाणावर शेतशिवारात दिसत आहे. यामुळे मजुरांनाही टाळेबंदीच्या काळात रोजगार उपलब्ध होत आहे. तसेच, शेतकरी आपल्याकडे असलेल्या जनावरांना पावसाळ्यात चाऱ्याची कमतरता जाणवू नये, यासाठी भुईमूग पिकापासून मिळणारा पाला साठवून ठेवण्याचे नियोजन करत आहेत‌. या वर्षी बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट होण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून, मोठ्या प्रमाणात खर्च करून अपेक्षित भाव न मिळाल्यानेदेखील शेतकरी नाराज आहे.

हेही वाचा: नाव त्‍याचे पारदर्शी..त्‍यात किर्तनकाराचा मुलगा; पण त्‍याचा कारनामा मोठाच

भुईमूग चाऱ्याला परजिल्ह्यात मागणी

वडाळीसह परिसरातील कोंढावळ, जयनगर, बामखेडा, तोरखेडा या भागातील भुईमूग चाऱ्याला परजिल्ह्यात पशुधन मालकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असून, दररोज चारा घेण्यासाठी परजिल्ह्यातील शेतकरी परिसरात येत आहेत. भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना चाऱ्यापासून चांगला मोबदला मिळत असल्याने मजुरीचा खर्च निघत असल्याचे शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

खराब वातावरणामुळे शेंगा पोकळ..

यंदा विहिरी-कूपनलिकांना पाणी चांगले असल्याने भुईमूग पिकाला मुबलक पाणी देता आले. मात्र, वेळोवेळी होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे भुईमुगाच्या शेंगा पूर्ण क्षमतेने भरल्या गेल्या नाहीत. पोकळ (गिधाड)ची संख्या जास्त आहे. त्यामुळे पीक जोमात दिसत होते. मात्र, प्रत्यक्षात उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

हेही वाचा: सामान्यांचे घरकुलाचे स्वप्नही आवाक्याबाहेर

बाजारपेठेत दर कमी..

अनेक संकटांना तोंड देत शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाचे पीक घेतले खरे मात्र उत्पादनात घट आली. बाजारपेठेतही दरात घसरण झाली आहे. लॉकडाउनमुळे इतर बाजारपेठेतही घेऊन जाणे शक्य नाही. त्यामुळे स्थानिक दोंडाईचा, शहादा, नंदुरबार येथे बाजार समितीत भुईमुगाची शेंग विकावी लागत आहे. प्रतिक्विंटल सरासरी ३२०० ते ३६०० रुपये भाव मिळत आहे.

loading image
go to top