ट्रॅक्‍टरखाली चालकाचा दबून मृत्‍यू; माहिती न दिल्‍याने शेतकऱ्याच्या घरावर दगडफेक

ट्रॅक्‍टरखाली चालकाचा दबून मृत्‍यू; माहिती न दिल्‍याने शेतकऱ्याच्या घरावर दगडफेक
Two-groups-hurled shahada
Two-groups-hurled shahadasakal

शहादा (नंदुरबार) : मामाचे मोहिदा (ता. शहादा) गावात सोमवारी (ता.१४) शेतात ट्रॅक्टर उलटून चालक दबल्याने जागीच ठार झाला. याबाबत शेतकऱ्याने (Farmer) उशिरा कळवल्‍याचा राग येऊन संतप्त जमावाने रात्री अकराच्‍या सुमारास शेतकऱ्याच्या घरावर हल्ला करत दगडफेक केली. समोरून दुसरा गटाचा जमाव देखील आल्याने (Riot conditions mohida village) दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. (mohida-village-Two-groups-hurled-stones-at-farmer's-house)

गावात दोन गट समोरासमोर आल्‍याने दंगल सदृश्‍य स्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने वेळीच पोलीस कुमक दाखल झाल्याने मोठी दंगल टळली. जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला. घटनेबाबत शहादा पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नसली तरी गावात राज्य राखीव दलाचा तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चालक मृतावस्‍थेत शेतातच पडून

मामाचे मोहिदा येथील सोना चंद्र चव्हाण (वय १९) हा गावातील शेतकरी अंबालाल जगन्नाथ पाटील यांच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. १४ जूनला ट्रॅक्टर पलटी होऊन दबला गेल्याने तो जागीच ठार झाला. उशिरापर्यंत सोना चंद्र चव्हाण घरी परत न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी शेतात जाऊन बघितले असता तो ट्रॅक्टर खाली दबला होता. त्याला बाहेर काढण्यात आले. आम्हाला उशिरा माहिती कळवली या कारणावरून रात्रीच्या सुमारास आदिवासी लोकांचा जमाव शेतकरी अंबालाल जगन्नाथ पाटील यांचा घरावर चाल करून आला व तुफान दगडफेक केली.

Two-groups-hurled shahada
गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण विभागाची पंचसूत्री

घरातील लोकांना मारहाण

घरातील सामानाची तोडफोड करून घरातील लोकांना मारहाण करण्यात आली. त्यात अंबालाल जगन्नाथ पाटील हे जखमी झाले आहेत. हा सारा प्रकार बघता दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जमाव चालून आला. दोन्ही जमाव आमने- सामने झाल्यानंतर दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलीस घटनास्थळी वेळेवर दाखल झाल्याने दंगल आटोक्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला. दरम्यान दगडफेकीत पोलिसांच्या गाडीवर देखील जमावाने दगडफेक केल्याने गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे. गावात शांतता असून दंगा काबू पथकासह शहादा, म्हसावद व सारंगखेडा येथील ज्यादा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. दोन्ही गटातील लोकांना शांततेचे आवाहन केले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत यांनी मोहिदा गावात भेट देऊन शांततेचे आवाहन केले पोलिस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

जमावावर गुन्‍हा दाखल

शहादा पोलिसात अंबालाल जगन्नाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून वीस ते पंचवीस आरोपींच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. मयत सोना चंद्र चव्हाण याच्यावर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात शांतता असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक बुधवंत करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com