तब्‍बल पावणेचार लाखाचा गांजा जप्त, पोलिसांची कारवाई 

धनराज माळी
Friday, 25 December 2020

सापळा रचून दोघांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. त्यांचाकडून ५ किलो ६०० ग्रॅम वजनाचा ३ लाख ७५ हजाराचा सुका गांजा व वाहने, वजनकाटासह अटक करण्यात आले.

नंदुरबार : नंदुरबार शहरातील कंजरवाडा भागातील रेल्वे कॉलनी परिसरात बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करण्यासाठी आलेले दोघेजण पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांचाकडून पावणे चार लाखाचा गांजा, दोन मोटारसायकली जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. 
पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यावरून प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मागदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे आपले पथक पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे, रविद्र पवार, अतुल बिऱ्हाडे, संदीप गोसावी, भटू धनगर, हेमंत बारी, अनिल बड़े, कल्पेश रामटेके, इम्रान खाटीक, विजय नागोडे, मुद्देमाल कारकून अशोक बहिरम यांच्या पथकाने रेल्वे कॉलनी परिसरात सायंकाळी पाचला सापळा रचून दोघांना मुद्देमालासह रंगेहाथ पकडले. त्यांचाकडून ५ किलो ६०० ग्रॅम वजनाचा ३ लाख ७५ हजाराचा सुका गांजा व वाहने, वजनकाटासह अटक करण्यात आले. शहानवाज खान जाफर खान पठाण (वय ४८, खादरनगर, आंध्रप्रदेश) व दुसरा सुदाम रमेश टिळंगे (वय ५४, रा. कंजरवाडा, नंदुरबार) असे दोघांची नावे आहेत. त्यांचे विरुध्द नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi nandurbar news police action hemp set in market sell