esakal | ढाब्‍यावर उभ्‍या ट्रकची ताडपत्री फाडली अन्‌ सापडला साठा; पोलिसांची कारवाई 
sakal

बोलून बातमी शोधा

gutkha

काची वर्तणूक शंकास्पद असल्याने त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने प्लास्टीक गोण्यांच्या २ थरांखाली गुटखा असल्याचे मान्य केले.

ढाब्‍यावर उभ्‍या ट्रकची ताडपत्री फाडली अन्‌ सापडला साठा; पोलिसांची कारवाई 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नंदुरबार : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने प्रकाशा गावाजवळ तळोदा रस्त्यावरील आप्पाच्या ढाब्याजवळ सापळा लावत ट्रकमधून प्लास्टिक दाण्यांच्या गोण्यांखाली लपवून होणारी अवैध गुटखा वाहतूकीवर कारवाई करत मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 
पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना प्रकाशा गावात अवैध गुटख्याची चोरटी वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांनी पोहवा मुकेश तावडे, बापु बागुल, राजेंद्र काटके यांचे पथकासह मिळालेल्या बातमीनुसार सापळा लावत ढाब्यावर ट्रक (क्रमांक एमपी०९ एचएफ ८५६३) येताच पथकाने ट्रकचालक व क्लिनर यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली. 

प्लास्‍टीक गोण्यांचे दोन थर
ट्रकची ताडपत्री उघडून पाहिले असता त्यात प्लास्टीकचे दाण्याच्या गोण्या होत्या. मात्र मिळालेली माहिती खात्रीशिर असल्याने तसेच ट्रकचालकाची वर्तणूक शंकास्पद असल्याने त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने प्लास्टीक गोण्यांच्या २ थरांखाली गुटखा असल्याचे मान्य केले. त्यानुसार ट्रकमधील प्लास्टीक दाण्यांच्या गोण्या उतरवून खात्री केली असता एकूण १५ लाख ५५ हजार ८४० रुपये किमंतीच्या ४० गोण्या विमल गुटखा व २ लाख ७४ हजार ५६० रुपये किमतीची विमल गुटख्यात मिक्स करण्यासाठीची ४० गोण्या व्ही- १ सुगंधीत तंबाखू मिळून आली. 

दोन्ही टेडर्सवर गुन्हा
सदर गुटखा हा गुजरात राज्यातील वापी येथील कृष्णा तंबाखू टेडर्स येथून भरला असुन तो मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपुर येथील नवीन टेडर्स येथे घेवून जात असल्याचे सांगितले. यामुळे महाराष्ट्रात बंदी असलेला सदर अवैध गुटखा व ट्रक ट्रॉला असा एकूण ३३ लाख ३० हजार ४०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन साबीर शेख गब्बु शेख (वय ४०) व इरफान खान इक्बाल खान (वय २२, रा. भौरांसा, ता. सोनखच, जि.देवास, मध्य प्रदेश) तसेच वापी येथील कृष्णा टेडर्सचे मालक व मध्य प्रदेशातील नवीन टेडर्सचे मालक या आरोपींविरुध्द शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 
 

loading image