
अफवांचा पेव म्हणून घरच्यांचा विरोध; तीने मात्र झुगारला अन् केले लसीकरण
साक्री (धुळे) : कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जनता एक ना अनेक उपाय शोधतेय.. तर दुसरीकडे आजाराने बाधित रुग्णांची आणि रुग्णांच्या नातेवाईकांची उपचारासाठी (coronavirus) सुरु आहे धडपड.. अशातच लसीकरणामुळे (vaccination) नागरिकांच्या उंचावल्यात अपेक्षा.. यातही अफवांचे फुटलेय पेव.. असे असताना ‘ती’ मात्र कुटुंबियांचा विरोध झुगारून पुढे आली अन् न जुमानता- न घाबरता तिने लसीकरण करून घेतले. तीच्या या धाडसाचे परिसरात सर्वत्र होतेय कौतुक..(coronavirus vaccination aadivashi vallage women)
कोरोनावर मात करता यावी यासाठी अनेक गावात लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत असून देखील नागरिक लसीकरण करून घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र याला अपवाद साक्री तालुक्यातील देवजीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोरसपाडा येथील झुलीबाई सोनू देवरे (वय ७३) ठरल्या. कुटुंबातील सदस्यांनी केलेला विरोध झुगारुन झुलीबाई यांनी लसीकरण करून घेत सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे अवाहन देखील केले आहे.
हेही वाचा: शाळा बंद पण मुख्याध्यापकाला चैन पडेना; शिक्षक नाही सोबतीला पण त्यांची शाळा सुरू
आवाहनाला त्यांनी दिला प्रतिसाद
कोरोना महामारीपासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम पर्याय सध्या तरी नागरिकांच्या समोर उपलब्ध झाला आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे; हा आग्रह आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने केला जातोय. झुलीबाई यांनी लसीकरणाबाबत दाखविलेला प्रतिसाद हा परिसरासह समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यांच्या विधायक कृतीमुळे लोकप्रतिनिधी आणि आरोग्य यंत्रणेनेच्यावतीने छोटेखानी शाल, श्रीफळ, साडीचोळी देत पोलीस पाटील वृषाली शेवाळे, सचिन शेवाळे, डॉ. हेमाली खैरनार यांनी सत्कार देखील केला आहे.
हेही वाचा: एकाच रूग्णाचे दोन रक्तगट; प्लाझ्मा देताना उडाला गोंधळ
त्या अशिक्षीत तरीही
सुमारे पंधराशे लोकवस्तीच्या देवजीपाडा (ता.साक्री) येथे आरोग्य यंत्रणेच्यावतीने विजय पाटील, एस. व्ही. साबळे, एस. टी. रोकडे, के. ए. पाडवी, निखिल पवार, पी. डी. राऊत, पी. पी. पाटील आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. गावातील आदिवासी बांधवांनी मात्र लसीकरणाकडे पाठ फिरविली. गावातील सुमारे ३१५ नागरिकांनी लसीकरण करून घेतले. यात झुलीबाई या आदिवासी महिलेने देखील लसीकरण करून घेतले. वयोवृद्ध आणि अशिक्षित असलेल्या झुलीबाई यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी लसीकरणाबाबत दाखविलेला सकारात्मक प्रतिसाद हा इतरांना प्रेरणादायी ठरणारा आहे. यामुळे प्रत्येकाने स्वतःहून पुढे येत लसीकरण करून घेणे हे स्वतःसोबत गावाच्या देखील हिताचे असल्याचे गावाच्या पोलीस पाटील सौ. वृषाली सचिन शेवाळे यांनी म्हटले आहे.
कोरोनापासून बचावासाठी होत असलेल्या लसीकरणाला आदिवासी बांधवांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. आदिवासी लोकप्रतिनिधी या नात्याने आवाहन करतो कि, प्रत्येकाने न घाबरता लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे स्वतःसह कुटुंबाच्या रक्षणासाठी गरजेचे आहे. प्रत्येकाने पुढे येत लसीकरण करून घेत आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे.
- खंडू पोसलू कुवर, जि.प. सदस्य, दहिवेल.
Web Title: Marathi Dhule News Coronavirus Vaccination Aadivashi Vallage
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..