esakal | जनता कर्फ्यू लागला अन्‌ ३६० किलो तेल चोरीला
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून शासनाकडून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन, संचारबंदी,जनता कर्फ्यू आदी आदेश काढून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

जनता कर्फ्यू लागला अन्‌ ३६० किलो तेल चोरीला

sakal_logo
By
कमलेश पटेल

शहादा (नंदुरबार) : शहरातील नवीन भाजी मार्केट मधील एका किराणा दुकानाच्या बाहेरून चोरट्यांनी सुमारे ३६० किलो वजनाचे ५५ ते ६० हजार किमतीचे दोन सोयाबीन तेलाचे बॅरल चोरून नेले, त्याच दिवशी शहरातील सरदार वल्लभाई पटेल मार्केटमध्ये तीन दुकाने फोडली. ही घटना सोमवारी (ता. २२) पहाटे दोन ते अडीचच्‍या दरम्यान घडली. दरम्यान धनराज अॅण्ड कंपनी या दुकानात वर्षभरात दुसऱ्यांदा चोरांनी चोरीचा प्रयत्न केला आहे. जनता कर्फ्यू व लॉकडाउनचा फायदा चोरांकडून होत असून येणाऱ्या काळात पोलिस प्रशासनाला रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वर्षभरापासून शासनाकडून हा आजार आटोक्यात आणण्यासाठी लॉक डाऊन, संचारबंदी,जनता कर्फ्यू आदी आदेश काढून प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सायंकाळी दुकाने लवकर बंद होत असल्याने या संधीचा फायदा घेऊन काही भुरट्या चोरांना चोरी करण्याची संधी मिळाली आहे. रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. 

एकाच दिवशी विविध ठिकाणी डल्ला
सोमवार (ता. २२) पहाटे नवीन भाजीपाला मार्केट या भागात असलेल्या किराणा दुकानात बाहेर ठेवण्यात आलेले सोयाबीन तेलाचे दोन बॅरल प्रत्येक बॅरल मध्ये सुमारे १८० किलो तेल होते. बॅरल पॅक असतानासुद्धा चोरांनी नेले. या दोन बॅरलची बाजार भावाप्रमाणे किंमत ५५ ते ६० हजार रुपये आहे. यासोबतच शहरातील सरदार वल्लभभाई पटेल मार्केट, मनोरंजन चित्रमंदिरला लागून असलेल्या धनराज अॅण्ड कंपनी या होलसेल किराणा दुकानातून दहाचा रुपयाच्या नोटा तसेच एक व दोन रुपयांची चिल्लरची नाणी, एक भ्रमणध्वनीचा हँडसेट चोरांनी चोरून नेला आहे. तसेच या दुकानासमोरील मनोहर साडी सेंटरचे सेंट्रल लॉक तोडून दुकानात चोरी करण्याच्या प्रयत्न केला. दुकानाला लागून असलेल्या मंजूर टेलर या ट्रेलर व्यवसायाच्या दुकानातून शिवणकाम करण्यासाठी आलेले कपडे चोरीला गेले आहेत. एकाच दिवशी चार ते पाच ठिकाणी या चोरांनी आपले हात साफ केला आहे. 
 
शहरातील किराणा दुकानातून सोयाबीनचे दोन बॅरल चोरून नेल्याची घटना घडलेली असल्याने शहर व परिसरात तेलाचे बॅरल विक्रीसाठी कोणी आल्यास व्यापाऱ्यांनी खरेदी करण्याच्या अगोदर व्यापारी असोसिएशन शी संपर्क साधावा. 
- मनोजकुमार जैन, सचिव, शहादा तालुका व्यापारी असोसिएशन. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image