सामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाचे प्राधान्य- विखे-पाटील

अंबादास शिंदे
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

नाशिकरोडः  : शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधांबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

नाशिकरोडः  : शेतकरी व सामान्य नागरिक यांना विविध योजनांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा पुरविण्यात येत आहे. या सुविधांबरोबरच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
    नाशिकरोड येथे विभागीय महसुल आयुक्त कार्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण श्री.विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपमहापौर प्रथमेश गीते,आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील,
महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालिका अस्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग आदी उपस्थित होते.
    श्री.विखे पाटील म्हणाले, शहरे विकसित आणि सुंदर करण्याबरोबरच शासनाने कृषी विकासाला देखील प्राधान्य दिले आहे. यासाठी मागेल त्याला शेततळे, उन्नत शेती समृद्ध शेतकरी अशा
योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न शासनामार्फत करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २ लाख ४ हजार ७६१ शेतकऱ्यांना १२४६
कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असून पीएम किसान योजनाअंतर्गत २ लाख२६ हजार १०७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे.
    ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २८ हजार, रमाई आवास योजनेअंतर्गत साडेतीन हजार, शबरी योजनेअंतर्गत तीन हजार
व पारधी आवास योजनेअंतर्गत ५२ कुटुंबांना पक्के घरकुल देण्यात आले आहे. यानुसारच जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत व राज्य सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना यशस्वीपणे राबविल्या जात आहेत, असेही श्री. विखे-
पाटील यांनी सांगितले.
     गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत प्रशासन,एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर, नौसेना, वायुसेना, लोकप्रतिनिधी व अनेक स्वयंसेवी संस्था यांनी केलेल्या कामामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत, त्याबद्दल श्री. विखे-पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news 15 aug day