राज्यात प्रथमच सेवापुस्तिका अद्ययावतीकरण शिबिर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

नाशिक ः महसूल कामकाजातील सुधारणा उपक्रमांतर्गत नाशिक महसूल विभागात विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी 1 डिसेंबरपासून कार्यालयीन कामकाज सुधारणा अभियान हाती घेतले आहे. प्रलंबित कामकाजाचा निपटारा करण्यासाठी कार्यालयीन अद्ययावतीकरणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत येत्या शुक्रवार(ता. 13)पासून विभागातील चार हजार 729 कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका अद्ययावतीकरणासाठी शिबिर होणार आहे. सेवापुस्तिकांच्या अद्ययावतीकरणासाठी राज्यात प्रथमच शिबिर होत आहे. 

नोंदी महत्वाच्याच

सेवापुस्तिका हा प्रत्येक महसूल कर्मचाऱ्याच्या कामकाजाच्या पद्धतीचा आरसा म्हटले जाते. सेवेत आल्यापासून तर निवृत्तीपर्यंतच्या नोंदी, घडामोडी आणि शेरे यातून कर्मचाऱ्याच्या कामकाज पद्धतीचे दर्शन घडते. मात्र, बऱ्याच सेवापुस्तिका अर्धवट, अपुऱ्या असतात. अनेकदा अडवणुकीच्या दृष्टीनेही सेवापुस्तिका अर्धवट ठेवण्यासारखे विषय उद्‌भवतात. त्याचा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होतो. मात्र, त्याविषयीच्या नोंदी होत नसल्याने 13 ते 15 डिसेंबरदरम्यान हे शिबिर होईल. तत्पूर्वी, बुधवारी (ता. 11) प्रशिक्षण झाले. त्यात प्रत्येक जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालयात लिपिकापासून तर विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. 

30 प्रकारच्या नोंदी 
कर्मचाऱ्यांशी संबंधित विविध 30 प्रकारच्या नोंदींची यात नोंद घेऊन शेरे लिहिण्याची पद्धत आहे. नाव, कौटुंबिक माहिती, जातप्रमाणपत्रापासून तर वैद्यकीय आणि चारित्र्यपयींतच्या विविध नोंदी यात असतात. मात्र, अपूर्ण सेवापुस्तिकेमुळे कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन व्यवस्थित होत नाही. मात्र, शिबिरात कर्मचाऱ्यांसबिंधित 30 प्रकारच्या नोंदी सेवापुस्तिकेत होणार आहेत. त्यात कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक माहितीशिवाय त्याच्या परीक्षा, कार्यमुक्तीच्या नोंदी, वैद्यकीय तपासण्या, चारित्र्य पडताळणी, विवाहानंतरचे नावात बदल, संगणक परीक्षा, कुटुंबाच्या प्रमाणपत्रांपर्यंतची माहिती अद्ययावत केली जाईल. 

मंजूर पदे 
विभागीय आयुक्त 01 
अप्पर आयुक्त 01 
जिल्हाधिकारी 05 
अप्पर जिल्हाधिकारी 06 
उपजिल्हाधिकारी 39 
तहसीलदार 73 
गट अ-ब-क 4,729 

विभागातील पाचही जिल्ह्यांतील महसूल यंत्रणांच्या प्रमुखांना त्यांच्या कार्यालयातील सेवापुस्तिका अद्ययावत झाल्याचा लेखी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयांना सादर करावा लागणार आहे. शिबिरात किती सेवापुस्तिका अद्ययावत झाल्या, किती नोंदी झाल्या, या माहितीसोबत सेवापुस्तिका अपूर्ण राहणार नाही, याची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. 
- दिलीप स्वामी, महसूल उपायुक्त, नाशिक 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news all worker officer service book